मुलांचे लग्न हा प्रत्येक पालकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. पण जर घरात आजोबा असतील तर त्यांच्यासाठी एक अद्भुत क्षण. कारण बहुतेक आजी आजोबांचं नातवडांचं लग्न बघण्याचं स्वप्न असतं. माझ्या डोळ्यादेखत तुझं लग्न झालेलं मला पाहायचं आहे, असे सगळेच आजी-आजोबा नातंवडांना सांगत असतात. नातवंडांना लहानपणापासून आजी-आजोबांनी लाडाने वाढवलेलं असतं त्यामुळे त्यांच्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री असते. दरम्यान अशाच एका नातीचा आणि तिच्या आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या आजोबांची नक्की आठवण येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओसोबत पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला तिच्या नातीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. नंतर ती फोन तिच्या नवऱ्याच्या हातात देते. तेव्हा नात म्हणते की मला आजोबांना काहीतरी सांगायचे आहे. थोड्यावेळीत ती तिची एंगेजमेंट रिंग आजोबांना दाखवते. हे पाहून आजोबा आनंदाने उड्या मारतात आणि शेवटी भावूक होतात. तिचा साखरपुढा झाला हे कळताच आजोबांचा आनंग गगनात मावत नाहीये. आजोबांना इतका आनं होतो की ते चक्क रडू लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: धबधब्याखाली खेळत असताना पर्यटकांवर काळाने घातला घाला; क्षणात डोळ्यासमोर सगळे पाण्यात…

इन्स्टाग्रामवर @upworthy या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले असून हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, आजोबांना नातीच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत.