आपल्या समाजात किती विषमता आहे ना! कोणी गरीब आहे तर कोणी श्रीमंत, कोणाकडे दोन वेळच्या जेवणासाठी पैसे नाही तर कोणी दिवसरात्र पार्टी आणि पबमध्ये पैसा उडवतात. कोणाकडे बस, रेल्वेने प्रवास करण्यासाठी पैसे नाही पण कोणाकडे एकापेक्षा जास्त आलिशान कार दारात उभ्या आहेत. श्रीमंताकडे असलेल्या गोष्टींचे स्वप्न पाहण्यात गरीब लोकांचे आयुष्य जाते. श्रीमंत आणि गरीबी यांच्यातील ही दरी कमी करण्याचा प्रयत्न सहसा कोणी करत नाही. श्रीमंत लोकांना आपल्या श्रीमंतीचा फार गर्व असतो असे म्हणतात पण सर्वजण असे नसतात. जगात काही लोक असेही आहेत जे फक्त पैशांनी नाही तर मनाने देखील श्रीमंत आहेत. आयुष्यात फार कमी क्षण असे असतात जेव्हा व्यक्तीला मनाची श्रीमंती दाखवण्याची संधी मिळते. अशाच एका मनाने श्रींमत व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पैशाने आणि मनाने श्रीमंत व्यक्तीच्या छोट्याश्या कृतीने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाच्या कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

गरीब किंवा सामान्य लोक आलिशान बाईक किंवा कार घेण्याचे फक्त स्वप्नचं आयुष्यभर बघत असतात. रस्त्यावरून एखादी आलिशान कार आणि बाईक दिसली वळून वळून त्याकडे पाहतात आणि आपल्या स्वप्नामध्ये हरवून जातात. काही लोकांना आलिशान कार किंवा बाईक नको असते फक्त त्याबरोबर एक फोटो मिळाला तरी ते खूश असतात. असा साधा विचार करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आवडत्या कारबरोबर फोटो काढायला मिळाला, त्या कारमध्ये बसण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. अगदी असेच काहीसे एका व्यक्तीबरोबर घडले.

हेही वाचा – Video : “अक्षय का विषय बहोत हार्ड है!”, अंघोळीला वैतागलेल्या चिमुकल्याने तयार केला भन्नाट रॅप; एकदा ऐकाचं, पोट धरून हसाल

हेही वाचा – Video : “लहानपणी हा खेळ कोणी खेळला आहे?” चिमुकल्यांचा खेळ पाहून आठवतील बालपणीचे दिवस

आलिशान कारमध्ये दिव्यांग व्यक्तीला फिरवले

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक दिव्यांग व्यक्ती एका आलिशान कारसमोर उभा राहून फोटो काढत आहे. हे कारचा मालक व्हिडिओ शुट करत त्याच्या जवळ येतो आणि काय करतो आहेस विचारतो. कार मालकाला पाहून दिव्यांग व्यक्ती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कार मालक त्याला थांबवतो आणि त्याचा मोबाईल बघतो ज्यामध्ये कारबरोबर काढलेले फोटो दिसतात. त्यावर कार मालक त्याच्यावर न ओरडता शांतपणे त्याला कारसमोर उभे राहण्यास सांगतो आणि आणखी चांगले फोटो काढून देतो. एवढंच नाही तर दिव्यांग व्यक्तीला तो आपल्या कारमध्ये बसवतो आणि आलिशान कारमध्ये फिरवून आणतो. न मागता पूर्ण इच्छा पूर्ण झाल्याने दिव्यांग व्यक्ती खूप आनंदी होतो. आनंदामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू देखील येतात. तो आनंदाने टाळ्या वाजवू लागतो. दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कार मालकाच्या डोळ्यातही पाणी येते. कार मालकाची छोटीशी कृती त्या दिव्यांग व्यक्तीसाठी आनंदाचे मोठे कारण ठरते.

हेही वाचा – “आयुष्यात हे दिवस परत आले पाहिजे”, मैदानावर कवायत करणारे विद्यार्थी पाहून तुम्हालाही आठवेल तुमची शाळा, पाहा सुंदर Video

नेटकऱ्यांनी केले कौतुक

एक्सवर @_MoyinPrabhas नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. अनेक जण कार मालकाचे कौतूक करत आहे. एकाने लिहिले की, “मालकाने कमाल केली, देवाने त्याच्यासारख्या लोकांना आशीर्वाद दिला पाहिजे,” दुसरा म्हणाला,”कमाल केली भावा”, तिसऱ्याने लिहिले की “खूपच सुंदर”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartwarming rides young man drives disabled friend in luxury car viral video selfless act of kindness snk