मुसळधार पावसामुळे देशाच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातून माणसं वाहून गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथे माणसांची ही अवस्था असेल तिथे मुक्या प्राण्यांचे काय हाल झाले असतील याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. शिवाय अनेक प्राण्यांचे कळपच्या कळप पाण्यातून वाहून गेल्याचे व्हिडीओदेखील समोर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशातच आता पुरामुळे मुक्या प्राण्याचे काय हाल झालेत हे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पुरात अडकलेल्या दोन माकडांना एका व्यक्तीने जीवदान दिल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-नोएडामध्ये यमुनेचे पाणी वाढल्यावर वन विभाग, एनजीओ आणि इतर विभागांचे कर्मचारी या लहान माकडांना वाचवताना दिसले.

हेही वाचा- “माझं भविष्य धोक्यात…” सुट्टीनंतर ऑफिसमध्ये परतलेल्या कर्मचाऱ्याबरोबर बॉसने केलं असं काही, वाचून तुम्हालाही संताप येईल

माकडांना दिलं जीवदान –

व्हायरल होत असलेल्या माकडांचा व्हिडिओ इतका हृदयस्पर्शी आहे की, तो पाहिल्यानंतर तुमचेही डोळे पाणवतील यात शंका नाही. व्हिडीओमध्ये दोन माकडांची पिल्ले पुरातून जीव वाचण्यासाठी एका उंच जागी घाबरून बसल्याचे दिसत आहेत. याचवेळी एक व्यक्ती त्यांच्यासाठी दूध घेऊन येतो आणि आलटून-पालटून दोघांना दूध पाजतो. व्हिडीओ नीट पाहिल्यास आधी लहान माकड दूध पिताना दिसत आहे, तर मोठे माकड त्याच्याकडे केवळ पाहात असल्याचं दिसत आहे. शिवाय ते लहान माकडासाठी आपली भूक आणि तहान विसरून लहान पिल्लाकडे पाहत आहे. त्यामुळे लहान पिल्लाचा जीव वाचावा भले आपल्याला दुध मिळो वा ना मिळो अशीच त्या माकडाची इच्छा असल्याचं पाहायला मिळत आहे.

हृदयस्पर्शी व्हिडिओ –

या व्हिडीओतील मोठे माकड स्वतः शांतपणे स्वतःची भूक भागविण्यासाठी अंगठा चोखताना दिसत आहे. पंतरु ते एकदाही त्या लहान पिल्लाच्या हातातील दुधाची बाटली ओढत नाही. शिवाय तो दुसऱ्या लहान पिल्लाचे जोपर्यंत दुध पिऊन होत नाही तोपर्यंत ते शांत बसल्याचंही दिसत आहे. त्यानंतर व्यक्तीने दुधाची दुसरी बाटली काढली आणि मोठ्या माकडालाही देताय हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. शिवाय हा भावनिक व्हिडीओ पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आले. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत या माकडांचे प्राण वाचवणाऱ्या भल्या माणसाचे आभार मानले आहेत.तर काही नेटकऱ्यांनी यापेक्षा अधिक पुण्य काहीही असू शकत नाही असं म्हटलं आहे.