मुक्या प्राणीमात्रांनाही तहान-भूक असते. हातावर पोट असणाऱ्या माणसांचीच दैना होत आहे, तर भूतदयेचे काय ? असा प्रश्न मनात सहजच डोकावतो. सध्याच्या वातावरणाचा माणसं असो, पशू असो वा पक्षी, सगळ्यांनाच त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आपण माणसं कुठेतरी चकरा मारून आपली भूक भागवतो, मात्र मुक्या जीवांना काहीही पर्याय राहत नाही, ज्यांची सर्व नैसर्गिक संपत्ती केवळ माणसांमुळेच नष्ट होत आहे. हीच परिस्थिती जाणून घेऊन एक व्यक्ती रस्त्यावर काम करत असताना पक्ष्यांचीही भूक भागवतोय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर चपलांच्या दुरूस्तीचं दुकान मांडून बसलेला आहे. जर तुम्ही व्हिडीओ बारकाईने पाहिला तर तुम्हाला दिसेल की त्याच्या दुकानाजवळ असंख्य पक्षी रांगेत उभे आहेत. त्यानंतर तो डाळींचे एक मोठे पॅकेट बाहेर काढतो आणि त्यांना खायला घालू लागतो. या हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांचेच मन जिंकले आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न न करताच पळून गेला नवरदेव, नवरीनं त्याचा पाठलाग करत गाठलं, पण….

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर मो. उमर हुसैन यांनी शेअर केला असून त्याला २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. असं दिसून येतं की ही एक विधी आहे जी तो दररोज पाळतो. कारण तो पक्ष्यांना अन्न देण्यास सुरुवात करण्यापूर्वीच तिथे आधीपासूनच पक्ष्यांचा थवा जमा झालेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ आयुष्यातला खूप मोठा धडा शिकवून जातो. दयाळूपणाची ही छोटीशी कृती कऱण्यासाठी तुम्हाला करोडपती होण्याची गरज नाही.

आणखी वाचा : साखरझोपेत हसणाऱ्या बाळाचा गोंडस VIDEO VIRAL, पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्माईल येईल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका व्यक्तीने असा नागिन डान्स केला की नाग बनून दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडीच घेतली…

या व्हायरल व्हिडीओला सोशल मीडियावरील नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नेटिझन्स या माणसाच्या हृदयस्पर्शी कृत्याचं कौतुक करता करता थकत नाहीत. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader