आपल्याकडे हिवाळा, पावसाळा या ऋतूंविषयी एक आकर्षण असतं. साहित्यातही या ऋतूंचं वर्णन अनेक चांगल्या विशेषणांनी केलं जातं. पण उन्हाळा म्हटला की बहुतेक जण नाकं मुरडतात. आता विद्यार्थ्यांना या दरम्यान सुट्ट्या असल्याने उन्हाळा आवडत नाही असं त्यांच्यापैकी तरी कोणी म्हणणार नाही. पण बाकीच्यांसाठी हा काळ म्हणजे मोठी शिक्षा असते. वसंतऋतूमध्ये फुटणाऱ्या पालवीबाबत कितीही रोमँटिक काव्यं लिहिली गेली असली तरी ‘वैशाखवणवा’ वगैरे शब्दही याच ऋतूबाबतचा तिटकारा व्यक्त करतात.

आता गेले तीन-चार दिवस उन्हाने चांगलाच जोर धरलाय. आता- आता पर्यंत सकाळच्या थंडीने अंथरूणातून उठावसं न वाटणारे आपण सगळे उन्हाच्या चटक्यांनी जागे होऊ लागलो आहोत.

तुम्हीही उन्हामुळे ‘लाईफमध्ये निराश’ वगैरे आहात का? असाल तर खास तुमच्यासाठी इंटरनेटवर उन्हाळ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय व्हायरल झाले आहेत पहा काय काय नुस्खे आहेत ते…

 

१. पहले में बहुत निराश था, अब में फ्रीज में हूँ

छाया- गूगल
छाया- गूगल

उन्हाच्या काहिलीवरचा हा डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक आहे. लहान असताना आपण सारखं सारखं फ्रिज उघडून चेहऱ्यावर थंड वारा घ्यायचो. या माणूस तर फ्रीजमध्ये झोपलाय. असं तुम्हीही करू शकता!  फक्त नंतर तो फ्रीज वापरून नका.

 

२. हर हर गंगे

छाया- गूगल
छाया- गूगल

दिवसभर उन्हाच्या तडाख्यात सापडल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केल्यावर जी भावना मनात दाटून येते ती या लहान मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

 

३. व्हाॅट अॅन आयडिया सरजी

छाया- गूगल
छाया- गूगल

 

याआधीचे दोन उपाय घरी पोचल्यावर करायचे आहेत पण बाईकने बाहेर फिरताना काय करणार? या गहन समस्येचं निराकरण वरच्या फोटोमध्ये आहे.

 

४. ट्रिपला जा, कूल व्हा

छाया- गूगल
छाया- गूगल

उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोस्तांसोबत जाणं म्हणजे मजाच. यासाठी तुम्ही स्पेशल बस करू शकता. आणि तुमचं बजेट कमी असेल तर बसला अशा प्रकारे कूलर जोडून थंड हवेच्या ठिकाणी थंड होत होत जाऊ शकतात.

 

उन्हाळ्याच्या दिवसात मनही थंड करायचं असतं त्यामुळे तुमच्या घरात जरी तापलेलं वातावरण असलं तरी तुम्ही मानसिक शांती नक्कीच मिळवू शकता. त्यासाठी खालचे काही उपाय करा

 

१. भा. पो. स्कूबा डायव्हिंग

छाया- गूगल
छाया- गूगल

खरं स्कूबा डायव्हिंग करायला हजारो रूपये लागतात पण या चित्रात दाखवल्याप्रमाणे जर काही जुगाड करायचा झाले तर तो होऊ शकतो. शेवटी स्कूबा डायव्हिंगची भावना महत्त्वाची

२. ठंडा ठंडा कूल कूल

छाया- गूगल
छाया- गूगल

नुसतं डोक्यावर तेल थापल्याने चांगली झोप लागण्याची गॅरंटी कधीच नसते. उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाची लादी हीच आपली खरी गर्लंफ्रेंड. मानसिक शांती मिळण्याचे चान्सेसही जास्त

Story img Loader