BMW, Mercedes submerged due to Heavy Rain Viral Video: महाराष्ट्रात मुंबईसह इतर शहरांत पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच धो धो कोसळणाऱ्या या पावसात बऱ्याच ठिकाणी जीवघेणे प्रसंगदेखील घडले आहेत, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कालपासून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठिकठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत असल्याने, तर रस्त्यांवर पाणी भरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पावसातील अशा अनेक घटनांचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात गुरगांवमधील रहिवाशाच्या हाय-एंड कारचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय.

व्हायरल व्हिडीओ (BMW, Mercedes submerged Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत गुरगांव शहरातील एका ठिकाणी पूरस्थिती (Heavy Rain) निर्माण झाल्याचं दिसतंय. यात एका व्यक्तीची ८३ लाखांची महागडी BMW कार तसेच Mercedes कारदेखील पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ ‘gajodharsinghcool’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कारच्या मालकाने म्हणजेच गजोधर सिंग याने तिथली सगळी परिस्थिती या व्हिडीओद्वारे सांगितली आहे.

हेही वाचा… Delhi Metro Viral Video: “पतली कमर मेरी…”, दिल्ली मेट्रोत इन्फ्लूएन्सरचा अश्लील डान्स; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाला, “वेडेपणा…”

या व्हिडीओमध्ये गजोधर सिंग म्हणाला की, “हा व्हिडीओ शूट करताना मी अक्षरश: थरथरतोय. ही मुंबई नाही किंवा हे बंगळुरू नाही, हे भारतातील मेट्रो शहर गुरगांव आहे. जेमतेम दोन तासांच्या पावसाने सेक्टर ५२ च्या इथे अशी परिस्थिती निर्माण केली आहे. सगळंच संपलंय. माझी गाडी बुडाली आहे, (BMW, Mercedes submerged) माझ्या घरात पाणी शिरलंय आणि आता माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही आहे. कारण मी एकतर बाहेर कुठेच जाऊ शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला मी काही अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी ठरला. इकडचे उपायुक्त (DC-Deputy Commissioner), मुख्यमंत्री (Chief Minister) यापैकी कोणीच उत्तर देत नाही आहे आणि गुरगावच्या महानगरपालिकेकडून तर मी काही अपेक्षाच ठेवत नाही आहे.

“मला माहीत नाही की आता नक्की काय करायला हवं आणि हे पाणी कधी ओसंडून जाईल. माझी गाडी तर पाण्याखाली गेलीच आहे. माझ्या आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झालीय. मला काहीच कळत नाही आहे की मी आता नक्की काय करू?” असंही तो म्हणाला.

युजर्सचा संताप

गजोधरने शेअर केलेल्या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सने संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. “पूरग्रस्त स्थितीत राहून नागरिकाने आनंदाने कर भरावा अशी सरकारची इच्छा आहे.” तर एका युजरने लिहिलं की, “या व्यक्तीविषयी माझा आदर वाढला, कारण अशा परिस्थितीत अगदी शांतपणे तो परिस्थिती सगळ्यांना सांगत आहे.” तर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा… साचलेल्या पाण्यात कपडे अन् शूज न भिजण्यासाठी तरुणीचा भन्नाट ‘जुगाड’; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, कमाल!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain bmw mercedes submerged in gurgaon video viral on social media dvr
Show comments