सध्या जगभरातील अनेक देशात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाही तर मुक्या प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक वन्य प्राणी जंगल सोडून शहरी भागात घुसताना दिसत आहेत. खरं तर, जेव्हा जेव्हा जंगली प्राणी माणसासमोर येतात तेव्हा ते एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जपानमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर हरणांचा कळप आणि माणसं एकत्र निवाऱ्याला थांबल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिमध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी एका इमारतीखाली काही माणसं उभी राहिल्याचं दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी माणसं उभी राहिली आहेत, त्याच ठिकाणी अनेक हरिण बसल्याचं दिसत आहे. शिवाय ते हरिण ना तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत ना माणसं त्यांना त्रास देत आहेत. हा व्हिडीओ खूप मनमोहक असून तो जपानच्या नारा शहरीतील आहे, जिथे मुसळधार पावसानंतर हे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले आहे.

हेही पाहा- हद्दच झाली राव! जोडप्याने प्री-वेडिंग फोटोशूटसाठी दिल्या अशा पोज की, व्हिडीओ पाहून डोकंच धराल

सध्या हरणांच्या कळपाचा आणि माणसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ जवळपास १५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ४७ हजार लोकांनी तो रिट्विट केला आहे. शिवाय अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

@YooHoodY नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “व्वा, मला एक दिवस इथे जायचे आहे, मला पाऊस खूप आवडतो. मी जिथे राहतो तिथे जास्त पाऊस पडत नाही, ज्यामुळे मी नाराज होतो.” दुसऱ्याने लिहिले, “प्राणी आणि माणसांमधील असे नाते पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे, जिथे हरणांना लोकांच्या उपस्थितीत सुरक्षित आणि आरामदायक वाटतं आहे. माणूस वन्यप्राण्यांबरोबर शांततेने कसे जगू शकतो याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain brings humans and deer under the same roof just watch the adorable video that is going viral jap
First published on: 27-07-2023 at 14:12 IST