Shocking Accident CCTV Footage Viral : पावसाळी हंगाम सुरु झाला असून रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील बेलमन्नू येथील करकाला परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. रस्त्यावरून दुचाकी चालवताना एका व्यक्तीच्या डोक्यावर झाड कोसळलं आणि मोठा अपघात घडला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. प्रवीण असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
झाड कोसळल्यानंतर प्रवीणला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर झाड कोसळून भयंकर अपघात घडल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रस्त्यावर मोठं झाड कोसळल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आणि वाहनचालकांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
रिपोर्ट्सनुसार, या अपघातामुळे करकाला-पदुबिदरी राज्यमार्गाची वाहतुक काही तासांसाठी ठप्प झाली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्तेवाहतूक सुरळीत केली. पावसाळ्यात दरडी आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालकांना आवाहनं केलं जातं.