Funny video goes viral: भारत हा चहाप्रेमींचा देश आहे, असे म्हणायला हरकत नाही. बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कपभर चहानेच होते. सकाळी चहा प्यायलो नाही, तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखीच वाटत नाही, असे बोलणारे कित्येक जण आपण पाहिले असतील. सकाळ असो किंवा संध्याकाळ, उन्हाळा असो किंवा पावसाळा, वेळेला चहा हा लागतोच. आपल्याकडे असे अनेक चहाप्रेमी सापडतील, जे आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात आणि दिवसभरात किमान तीन ते चार कप चहा पितात. पण, सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

जीवापेक्षा चहा महत्वाचा

कधीही, कुठेही, कसाही चहा पिणाऱ्या लोकांचे चहाप्रेम म्हणजे एक प्रकारचे वेड असते हे या माणसाने सिद्ध केलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक तरुण चक्क मुसळधार पावसात बसून चहा घेत असल्याचा दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या आसपास भरपूर पाणी साठले आहे. लोक या पाण्यापासून वाचण्यासाठी इतरत्र पळत आहेत. पण, ही व्यक्ती मात्र लोक काय म्हणतील याची पर्वा न करता मस्तपैकी भुरके मारून चहा पितोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. या तरुणासारखी अशी तऱ्हेवाईक कृती फक्त अस्सल चहाप्रेमीच करू शकतो.

चहा म्हणजे जीव की प्राण

काही लोकांसाठी चहा म्हणजे जणू सर्वस्वच असते. त्यामुळे अशा एखाद्या चहाप्रेमीला चहाची तलफ आली आणि मग भले मुसळधार पाऊस असला तरी तो चहा त्या वेळेवर मिळविण्यासाठी काय करू शकतो? याचे दर्शन घडविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ गुजरातमधील सुरत येथील असल्याचे कळतेय. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kolhapur Rain: कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसात ‘हा’ VIDEO ठरतोय चर्चेचा विषय; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर surat.express नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक चहाप्रेमी आणि नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. यातील अनेक नेटकऱ्यांनी या तरुणाची मजा घेतली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, ‘आपल्या भारतात किती टॅलेंटेड लोक आहेत यार’.तर आणखी एकाने म्हटलंय, ‘हे असलं कुणीही काही करू नका.