Himachal Pradesh Snowfall Shocking Video : ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये दाखल होतात. डिसेंबर, जानेवारीमध्येच मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असल्याने लोक इथे सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. यंदाही हिमाचलमधील शिमला, मनाली, कासोल, धरमशाला, डलहौसी, सोलांग व्हॅलीसह अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले आहेत. इथे छोटी-मोठी सगळी हॉटेल्स, होमस्टे हाऊसफुल आहेत.

बर्फवृष्टीमुळे अटल बोगद्यातही हजारो वाहने अडकून पडली

मनाली व सोलांग व्हॅली येथे भेट देण्यासाठी हजारो वाहनांनी लोक आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एकीकडे ट्रॅफिक आणि दुसरीकडे जोरदार बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. बर्फवृष्टीमुळे अटल बोगद्यातही हजारो वाहने अडकून पडलीत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फामुळे अपघाताच्या घटना घडतायत. अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावरील अनेक जण पर्यटकांना, “चुकूनही मनाली, सोलांग व्हॅलीमध्ये येऊ नका,” असा सल्ला देताना दिसत आहेत.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Weather forecast for North Maharashtra Marathwada Vidarbha
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार

दरम्यान, @chluckytyagi नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने तिथल्या गंभीर परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. तसेच, जो कोणी मनालीला येण्याचा बेत करीत असेल, त्याने इथे ३-४ दिवस येण्याचा विचारही करू नये. कारण- तिथे जोरदार बर्फवृष्टी होणार आहे, असे आवाहन केले आहे.

युजर त्यागीने पोस्ट केलेला व्हिडीओ हिमाचलमधील रात्रीच्या अंधारात घेतलेला आहे. त्यात बर्फाच्छादित सोलांग व्हॅली – अटल बोगदा रस्त्यावर अडकलेल्या गाड्यांची मोठीच्या मोठी रांग दिसत आहे. त्यागी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन ते अडीच हजार वाहने अडकली आहेत. वाहतूक कधी आणि कशी सुरळीत होईल हे मला माहीत नाही. अडकलेल्या वाहनांमध्ये वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीनंतरची भीषण स्थिती

Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

हिमाचलमधील परिस्थितीवर युजर्सनी व्यक्त केली चिंता

क्लिपमध्ये, व्लॉगर त्यागीने लोकांना आवाहन करीत म्हटले की, मनाली आणि सोलांग व्हॅलीमध्ये येत्या ३-४ दिवसांत जोरदार बर्फवृष्टी होणार आहे. अशा परिस्थितीत इथे येण्याचा अजिबात विचार करू नका. दरम्यान, या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स करीत चिंता व्यक्त करत आहेत. तर काही जण मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले की, आम्ही बर्फवृष्टी पाहण्यासाठी कसोलला जात आहोत. दुसऱ्याने लिहिले की, कोणीही येत नाही. तुम्ही सगळे आराम करा आणि बर्फाकडे पाहत आनंद घ्या, आम्ही येत नाही आहोत. तिसऱ्या युजरने लिहिले की, भाऊ, कारचे हीटर जास्त वेळ चालू ठेवू नका. ऑक्सिजन येत राहावा म्हणून खिडक्या उघड्या ठेवा. मला आशा आहे की, आपण लवकरच आपल्या निश्चित स्थळी सुखरूप पोहोचाल.

Story img Loader