हे जगचं असं आहे की येथे काहीही होऊ शकतं अगदी काहीही. आता हेच बघाना एका वायूदलातील सैनिकाने आपलं हेलिकॉप्टर चक्क हायवेवरच लँड केलं, आपण नक्की कुठे विमान लँड केलंय हेही त्याला कळलं नाही. त्यामुळे संभ्रमात पडलेला हा पायलट विमानातून खाली उतरला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रक ड्रायव्हरला पत्ता विचारला. या विनोदी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कझाकीस्तानमधला हा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी येथील हायवेवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. बर्फवृष्टीमुळे सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. त्यामुळे पायलटने चक्क हायवेवरच विमानाचे लँडिग केले. आपण नक्की कुठे आलोय हे देखील त्याला कळलं नाही. पण सुदैवाने समोर एक ट्रक दिसला आणि हा पायलट चक्क विमानातून खाली उतरला.  ट्रक चालकाला त्याने पत्ता विचारला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कझाकीस्तान संरक्षण मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. येथे वायुदलातील सैन्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. खराब हवामानात हेलिकॉप्टर चालवण्याचं ट्रेनिंग सैनिकांना देण्यात आले होते आणि याच ट्रेनिंगचा भाग म्हणून त्याने  हेलिकॉप्टर हायवेवर लँड केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

Story img Loader