बरेचदा फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर सक्रीय असताना स्वच्छंदी फिरण्यावर एखादी तरी पोस्ट वाचण्यात येतेच. आयुष्य फक्त भटकंतीतच जावे.. ८ तसांची नोकरी आणि कोणाच्या तरी दडपणाखाली काम करण्यापेक्षा पक्ष्यासारखे मुक्त होत दाही दिशांना भटकावे, वा-यावर स्वार होऊन जावे कोणा दूर देशा.. नदी बरोबर वाहत जाऊन जावे एखाद्या गावा असे एका ना दोन किती विचार मनात येतात. खरच सगळं सोडून जग पालथं घालण्याएवढी भटकंती आपल्याला करता आली असती तर अशी कल्पना कधी ना कधी तरी डोक्यात येते. पण आपला खयाली पुलाव काही शिजत नाही. मग सुट्टी कशी मिळणार? फिरायला पैसे कुठून येणार? असे एक ना दोन कितीतरी विचार मनात येतात आणि मग हे स्वप्न ती पोस्ट फक्त लाईक करण्यापुरता निघून जाते. या सगळ्यांनाच डेन्मार्कच्या हेनरिकचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण या पठ्ठ्याने चक्क एक दोन नव्हे तर दहा वर्षांत १९३ देश पालथे घातले आहेत.
वाचा : अशिक्षित असूनही ६० वर्षांच्या वृद्धाने झोपडीत सुरु केले ग्रंथालय
२८ वर्षांचा हेनरिक डेपीसेन २८-२९ च्या आतला. जग पालथे घालायचे या एका विचाराने झपाटलेला. म्हणून गेल्या दहा वर्षांत त्याने एक दोन नाही तर चक्क १९३ देशांची भटकंती केली आहे. भटकंतीवर आधारित कार्यक्रम बघून त्यालाही जग पालथे घालण्याची इच्छा होऊ लागली. वयाच्या १७ वर्षी त्याने इजिप्तची सफर केली. त्यानंतर बघता बघता त्याने ५० देश पालथे घातले. पुढे भटकंतीचा किडा काही केला जाईना म्हणून आखणी ५० देशांची सफर त्याने केली. पण हे वेड असे काही डोक्यात भिनले की आता फक्त जग आणखी फिरायचे असा ध्यास घेऊन या अवलीयाने हा हा म्हणता १९३ देश पालथे घातले. हेनरिक स्वत: ब्लॉग लिहितो, त्यामुळे आपल्या सफारीच्या अनेक रोमहर्षक काहाण्या त्याने लिहिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तो भारतातही आला होता. आता तुम्ही म्हणाल याने फिरण्यासाठी किती खर्च केला असेल बुवा? पण तसे बघायला गेले तर हेनरिकने यासाठी फार पैसे खर्च केले नाही. त्याने फक्त ५५ लाख गेल्या दहा वर्षांत खर्च केले. आपला आयफोन, चार्जर आणि व्हिसा काही पैसे एवढ्याच गोष्टी सोबत घेऊन हेनरिकने प्रवास केले आहेत. त्यामुळे २८ व्या वर्षी एवढे देश पालथे घालणा-या हेनरिक सारखे आपल्याला जगावेसे वाटले नाही तर नवलच म्हणावे लागेल.
वाचा : गरिबांना अन्न मिळावे म्हणून २३ वर्षांच्या तरुणाची धडपड