Elephants Gharge Towards Three Men Taking Selfies Video : सोशल मीडियावर पिसाळलेल्या हत्तींच्या कळपाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हत्तींचा कळप तीन व्यक्तींचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. या तीन व्यक्ती हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घेत होते, यावेळी हत्तींना राग आला आणि त्यांनी तिघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत त्यांचा पाठलाग केला. यानंतर तिघेही जीव वाचण्यासाठी रस्त्यावरून पळ पळ पळू लागले. यावेळी तिथे उपस्थित एका तरुणाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लखीमपूर खैरीच्या दुधवा व्याघ्र प्रकल्पातील पालिया गौरीफंटा मार्गावरून तिघेजण नेपाळला जात होते. यावेळी रस्त्यात त्यांना हत्तींचा कळप दिसला. या कळपात जवळपास ५० हत्तींचा समावेश होता. कळपासोबत सेल्फी घेण्यासाठी व्यक्ती कळपाजवळ पोहोचले. यावेळी हत्तींनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर विघांनी हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. यामुळे हत्तींना राग आला आणि त्यांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने तिघांचा पाठलाग करायला सुरुवात केली.
हत्तींचा कळप मागे येत असल्याचे पाहून तिघेही जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. धावत असताना एक तरुण रस्त्यावर पडला. पण सुदैवाने तो वेळीच उठला आणि पुन्हा पळत सुटला. यावेळी दूरवर उभ्या असलेल्या लोकांनी आवाज काढला तेव्हा हत्ती थांबले आणि वळून जंगलाच्या दिशेने गेले.
यावेळी समोर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली. दरम्यान जंगलात फिरताना हत्तींना त्रास देऊ नये याविषयी आयएफएस अधिकारी नियमितपणे सल्ला देणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात.
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सेल्फी घेण्यासाठी लोक मूर्खासारख्या गोष्टी करतात. असे अनेक भयंकर व्हिडिओ आहेत ज्यात संतप्त आणि चिडखोर हत्ती माणसांवर हल्ला करताना दाखवले आहेत. मात्र या घटनेने इंटरनेटवरील युजर्सना धक्का दिला आहे.