सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. सिंहाला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो. सिंह समोर दिसला की माणसांचा देखील थरकाप उडतो. सिंहासमोर कुठलाही प्राणी आला की तो त्याची शिकार केल्याशिवाय सोडत नाही. मात्र, जेव्हा मोठे प्राण्यांची शिकार करायची असते तेव्हा एखादा सिंह एकटा शिकार न करता एकत्र कळपाने शिकार करतात. सध्या जंगलातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भुकेलेल्या सिंहाच्या कळपामध्ये भलीमोठी म्हैस अडकली आहे. सिंहाचा कळप बिचाऱ्या म्हशीचा अशाप्रकारे सतवतो की बिचारी म्हैस त्यांचा सामना करून थकते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने प्रत्येकाचा थरकाप उडवला आहे.
अनेकदा असे दिसून येते की जेव्हा सिंहाला एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करायची असते तेव्हा ते एक गट तयार करून त्याची शिकार करतात आणि नंतर त्यांची ताकद अनेक पटींनी वाढते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असाच प्रकार बघायला मिळत आहे. जिथे सिंहांच्या कळपाने एकत्र येऊन म्हशीवर हल्ला केला आणि तिला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. यादरम्यान एक क्षण असा आला की म्हैस शिकारीच्या तावडीतून बाहेर पडेल असे वाटत होते, परंतु शेवटी म्हैस सामना करत थकते युद्धात आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते.
( हे ही वाचा: ऐकावे ते नवलच! ऑनलाइन लुडो खेळताना जुळले प्रेम; मुलगी लग्नासाठी थेट पोहोचली यूपीमध्ये)
येथे व्हिडिओ पहा
( हे ही वाचा: Video: भुकेलेल्या वाघाच्या पिल्लांना दूध पाजताना दिसली कुत्री; नेटकरी म्हणतात ”आई तर….”)
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भुकेलेल्या सिंहांचा कळप एकत्रितपणे म्हशीवर हल्ला करतो. ते प्रथम त्याला चारही बाजूंनी घेरतात जेणेकरून तो पळून जाऊ नये. इतक्यात त्या म्हशीचा एक साथीदार येतो आणि सिंहांच्या कळपावर हल्ला करतो. यामुळे सगळे सिंह काही सेकंद घाबरतात आणि पळून जातात, पण साथीदार दूर होताच पुन्हा त्या म्हशीला घेरतात. आणि सिंह म्हशीच्या झटापटीत बिचाऱ्या म्हशीला आपला प्राण गमवावा लागतो.