जंगल म्हटलं की, आठवण येते ती प्राणी, पक्षी आणि त्यांच्या होणाऱ्या शिकारीची. जंगलातील जीवन आव्हानांनी भरलेले आहे. जंगलात राहणारे प्राणीही रात्रंदिवस इकडून तिकडे धावत राहतात या चिंतेत की, कुठल्यातरी भक्ष्य प्राण्याने त्यांना आपली शिकार बनवू नये. कधीकधी अशी देखील वेळ येते की, शिकारी प्राणी दुसऱ्या शिकारी प्राण्याची देखील शिकार करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहिणींच्या कळपाने एका बिबट्याची शिकार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहिणींचा कळप एका बिबट्याच्या भोवताली फिरत आहे. त्यानंतर एका झटक्यात ते बिबट्या सारख्या शिकारी प्राण्याला आपली शिकार बनवतात. याचा व्हिडीओ पाहताना नक्कीच तुमचा थरकाप उडेल. शिकार करणारा प्राणी देखील भक्ष्य बनू शकतो याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येते.

( हे ही वाचा: देव तारी त्याला कोण मारी! कार आणि ऑटोच्या जबरदस्त धडकेत महिला नशिबाने वाचली; व्हिडीओ पाहिल्यावर उडतील तुमचे होश)

येथे व्हिडीओ पहा

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जंगलात एका बिबट्याला सिंहिणींनी घेरले आहे आणि त्याला आरामात भक्ष्य बनवता यावे म्हणून त्याला त्रास देत आहेत. यादरम्यान बिबट्या त्याच्या वेदनांनी वेढलेला असतो. पण आरडाओरडा ऐकायला तिथे कोणीच नसते. हा बिबट्या म्हातारा झाला आहे त्यामुळे म्हातारपणामुळे तो जीवन-मृत्यूच्या लढाईत असहाय्य दिसतो आहे.

( हे ही वाचा: Viral Video: लग्न जेवणात पापड मिळाला नाही म्हणून वराच्या मित्रांनी केला भयानक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल)

व्हिडीओच्या शेवटी बिबटा हतबल होतो आणि हालचाल करायची थांबवतो. तर मग कुठेतरी सिंहीण बिबट्याला चाटणे थांबवते. ही क्लिप पाहिल्यानंतर एक गोष्ट समजली की जंगलात कुणी म्हातारा झाला की त्याची ताकद संपते. वर्ल्ड ऑफ वाइल्डलाइफ अँड व्हिलेज नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Herd of lioness killed leopard shocking clip goes viral gps