एका कारखान्यामध्ये तब्बल २००० किलोंचा गुलकंद तयार करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. गुलकंद, पानातील एक महत्त्वाचा घटक आहे जो चव वाढवण्यासाठी वापरला जातो. गुलकंद हे जाम किंवा मुरंब्यासारखा पदार्थ आहे.व्हिडीओमध्ये गुलकंद करण्याची किचकट प्रक्रिया टप्याटप्याने दाखवली आहे आणि जे पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओच्या सुरूवातीला गुलाबाच्या पाकळ्या एका ठिकाणी गोळा केल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या टबमध्ये साखर टाकून मिसळल्या जातात. हे मिश्रण स्टीलच्या भांड्यामध्ये आंबायला ठेवले जाते याला किण्वन प्रक्रिया म्हणातात.एक महिन्यापेक्षा जास्त दिवस ही प्रक्रिया सुरू असते त्यानंतर गुलकंद तयार होते.

हेही वाचा – तुळशीबाग, भाजी मंडईमध्ये दिसले पंतप्रधान मोदी? जाणून घ्या व्हायरल फोटोंचे सत्य

फूड व्लॉगर अमर सिरोही यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “गुलकंद आवडते अशा व्यक्तीला टॅग करा”.

या व्हिडीओवर अनेकांनी पसंती दिली आहे आणि काही जणांनी कमेंटही केल्या आहेत. गुलकंद बनवण्याची किचकट प्रक्रिया पाहून इंस्टाग्राम युजर्स थक्क झाले आहेत.

एका व्यक्तीने “Yummy” असे लिहिले तर दुसर्‍याने “माझे आवडते” असे लिहिले.

हेही वाचा – अस्वल आहे की माणूस? दोन पायांवर उभ्या असलेल्या विचित्र प्राण्याचा व्हिडीओ झाला व्हायरल, प्राणीसंग्रहालय म्हणे, ‘हे……

गुलकंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे रक्ताभिसरणात मदत करते आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्यासाठी फायदेशीर ठरते. हे एक एनर्जी बूस्टर आहे कारण ते शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवते. अॅनिमियासाठी ते फायदेशीर आहे मदत करते, आम्लता कमी करते आणि चयापचयसाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. हे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे आणि त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heres how gulkand an essential ingredient in paan is made viral video snk
Show comments