मंदिरातल्या दानपेटीत अनेक जण पैशांच्या रुपात आपले दान टाकतात. दानपेटीत पैसे टाकून भाविक आपला नवस फेडतात. मंदिरात पैसे दान म्हणून टाकण्याची पद्धत नेहमीची आहे. काही जण देवला पैशांचा हार देखील अर्पण करतात. पण गुजरातमधल्या एका मंदिरात पैशांची अशी काही आरास करण्यात आली होती कि ती पाहून कोणत्याही भाविकाचे डोळे विस्फारल्या शिवाय राहणार नाहीत. गुजरातमधली वडोदरा जिल्ह्यात काष्टभजनदेव हनुमानजी मंदिर आहे. या मंदिरात तब्बल ११ लाख रुपयांची आरास करण्यात आली होती. शंभर, पाचशे, हजारांच्या नोटा वापरून त्याचे तोरण आणि माळा तयार करण्यात आल्या होत्या आणि यांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले होते.
पैशांची ही सजवाट पाहण्यासाठी अनेक भाविकांनी या मंदिरात गर्दी केली होती. भारताचा आर्थिक विकासदर सुधारावा तसेच रुपयाचे अवमुल्यांकन थांबावे यासाठी आपण पैशाने मंदिर सजवले असल्याची माहिती मंदिराचे संस्थापक राकेश पटेल यांनी एएनआय या वृत्तवाहिनीला दिली. गेल्या तीन वर्षांपासून मंदिराचा गाभारा पैशांनी सजवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात शेवटच्या श्रावणी शनिवार निमित्त पैशांची आरास करण्यात आली होती. गेल्यावर्षी ७ लाख रुपयांची आरास करण्यात आली होती. दरवर्षी या रकमेत वाढ होत जाते. या मंदिरातील हनुमान हा नवसाला पावतो अशी येथल्या भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे पैशांची आरास केल्याने अर्थव्यवस्थेचा दर सुधाराले अशी आशा त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा