A video of a Bengaluru YouTuber clearing path for an ambulance : अँब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका ही जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी धावत असते. त्यामुळे जेव्हाही रस्त्यात अँब्लुलन्स समोर येते तेव्हा लोक रस्ता मोकळा करून मार्ग देतात. पण अनेकदा इतकी वाहतूक कोंडी असते की एक गाडी देखील पुढे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर अँब्युलन्स त्या वाहतूक कोडीत अडकली तर एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा वेळीच उपचार न मिळाल्यास त्याला जीव गमावावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये फक्त माणुसकी आणि प्रसंगवाधानच एखाद्याचा जीव वाचवू शकते.
असाच काहीसा प्रकार नुकताच बंगळुरूमध्ये घडला जेव्हा युट्यूबवरच्या प्रसंगावधान दाखवत वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँब्युलन्सची सुटका केली. हा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडिओ झाला आहे. अनेक वापरकर्त्यांनी त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले, त काहींनी नियमांचे उल्लंघन करण्याची गरजच नसावी असे मत व्यक्त केली.
‘Rumi15_kindhearted’ या युजरने शेअर केलेल्या या क्लिपमध्ये, “युट्यूबर बाईकवरून जात असताना जेव्हा त्याला एका रुग्णवाहिकेला ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे पाहिले तेव्हा तो मदतीसाठी धावून गेला आणि त्याने ड्रायव्हरची मदत केली.
वाहतूक कोंडीत अडकून अँब्युलन्सला वाहतूक कोंडीतून बाहेर पडायला उशीर होऊ नये म्हणून या विलंबामुळे जीव गमवावा लागू नये म्हणून, युट्यूबरने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले. त्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या रस्त्याने बाईक थांबवली.
अनेक वापरकर्त्यांनी या कृतीचे कौतुक केले, तर काहींनी असा युक्तिवाद केला की,”अशा परिस्थिती बंगळुरूच्या सदोष वाहतूक व्यवस्थापनाचे दर्शन घडवतात. युट्यूबर म्हणाला, “आणीबाणी सिग्नल सुटण्याची वाट पाहत नाही. जेव्हा महत्त्वाचे असते तेव्हा आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज असते.”
“सर्वच हिरो कॅप घालत नाहीत,” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्याने म्हटले, “भाऊ योग्य काम करण्यासाठी चुकीच्या दिशेने गेला.”
“चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याचे समर्थन मी फक्त तेव्हाच करतो,” एका वापरकर्त्याने म्हटले.
तथापि, इंटरनेटवर काही जणांनी या समस्येचा व्यापक दृष्टिकोनावर भर दिला.
“बरं, हे शहर भारताची आयटी राजधानी म्हणून ओळखले जाते. ते खूप लवकर विकसित झाले. ते त्याच्या वाहतूक समस्यांसाठी देखील ओळखले जाते. जास्त लोकसंख्येला आधार देण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा नाहीत. पण, शहरातील जुने भाग चांगले आहेत,” एका वापरकर्त्याने म्हटले.
दुसऱ्या एका वापरकर्त्याने पुढे म्हटले, “अॅम्ब्युलन्स येईपर्यंत त्या चौकात गाड्यांची मोठी रांग लागली होती हे स्पष्ट आहे. चौकातील गाड्यांना कदाचित ते दिसले नसेल कारण ते खूप दूर होते आणि वाट पाहणाऱ्या लोकांना काहीही करता आले नाही कारण त्यांच्याकडे कुठेही जायचे नव्हते.”
विविध मते असूनही, या घटनेने बंगळुरूच्या वाहतूक कोंडीमध्ये चांगल्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या गरजेवर पुन्हा चर्चा सुरू केली आहे.