Heron Dance Viral Video : सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. यातील काही फार मजेशीर असतात तर काही इमोशनल असतात. याशिवाय काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. यात प्राणी, पक्षांचेही सुंदर, मनमोहित करणारे किंवा मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून अनेकदा खूप हसायला येते, तर कधी ते व्हिडीओ डोळ्यांना खूप सुंदर वाटतात, जे पाहून मन आनंदी होऊन जाते. सध्या अशाच एका बगळ्याच्या गोंडस कृतीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो सोशल मीडियावर लोकांच्या खूप पसंतीस उरतोय.

पाणी पिता-पिता नाचतोय बगळा

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक बगळा कसा मजेशीरपणे आपली तहान भागवतोय. तो एका तलावाच्या काठावर उभा आहे आणि त्याचे तोंड पाण्यात आहे, पण त्याचे पाय मात्र ३६० अंशाच्या कोनात फिरत आहेत. लवचिक शरीर असल्याप्रमाणे अगदी तो मस्त मजेत गोल गोल फिरत पाणी पिण्याचा आनंद घेतोय, त्याचं ते मजेशीरपणे फिरणं पाहून तुम्हालाही खूप हसू येईल. बगळ्याची पाणी पितानाची मजेशीर कृती पाहून काही जण त्याला डान्सर म्हणतायत. तर काही तो रामदेव बाबांप्रमाणे योगा करतोय असे म्हणतायत. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केल्या आहेत.

एका युजरने बगळ्याची कृती पाहून लिहिले की, ‘असे दिसते की बाबा रामदेव योगा करत आहेत.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘हा बगळा आपल्यापेक्षा चांगला नाचत आहे.’ तिसऱ्याने लिहिले की, “मायकल जॅक्सनचा भाऊ बगळा जॅक्सन.” चौथ्याने लिहिले की, ‘बाबा रामदेव यांचे शिष्य.’ व्हिडीओवर अशा मजेदार कमेंट्स पोस्ट करून लोक आता बगळ्याच्या कृतींचा आनंद घेत आहेत.