सोशल मीडियाचे आपण सगळेजण मास्टर झालेलो असलो तरी अनेक वर्ष अस्तित्त्वात असणाऱ्या या साईट्स आणि अॅप्सच्या फीचर्समध्ये अनेक बदल होत असतात. त्यातले काही बदल यूझर्सना आवडतात तर काही आवडत नाहीत. पण हे बदल सतत केले जात असतात हे तर नक्कीच. या बदलांची नोंद ठेवणं अनेकदा कठीण जातं. पण या सतत बदलणाऱ्या फीचर्स आणि अपडेट्सवर नजर ठेवणं आपल्यालाच फायद्याचं ठरतं.

तर पाहुयात काही फेमस सोशल मीडिया अॅप्स आणि वेबसाईट्समधले काही ‘हिडन फीचर्स’

व्हाॅट्सअॅप

एकवेळ बाकी काही नसेल तरी चालेल पण व्हाॅट्सअॅपशिवाय आपलं पान हलत नाही. कोणालाही काही सांगायचं असेल किंवा फाॅरवर्ड करायचं असेल तर व्हाॅट्सअॅपशिवाय सध्यातरी पर्याय नाही. पण व्हाॅट्सअॅपच्या वापरामधला जाणवणारा एक मोठा तोटा म्हणजे त्यात खर्च होणारा डेटा!

रोजच्या रोज आपल्या व्हाॅट्सअॅपमध्ये खोऱ्याने व्हिडिओज् येऊन पडत असतात. २ एमबीपासून वाट्टेल तेवढ्या एमबीचे हे व्हिडिओज् येऊन येऊन महिना संपण्याच्या आधी आपला डेटा प्लॅन संपवून टाकतात. यावर साधारणपणे सगळ्यांना माहीत असलेला उपाय म्हणजे ‘व्हाॅट्सअॅप’चे व्हिडिओज् आपोआप डाऊनलोड केले जाणार नाहीत असा पर्याय ‘सेटिंग्ज’मधून निवडणे.

याशिवाय एखाद्या विशिष्ट चॅटमध्ये आपला डेटा किती ‘खाल्ला’ जातोय हे आपण पाहू शकतो. यासाठी ‘Settings’ मध्ये जाऊन ‘डेटा अँड स्टोरेज यूसेज’ सिलेक्ट करा. यामध्ये जास्त स्टोरेज किंवा डेटा खाणारा चॅट सगळ्यात वर तर बाकीचे उतरत्या क्रमाने त्याच्याखाली अशी लिस्ट दिसेल. त्यानुसार आपण कोणता चॅट डिलीट करायचा आणि कोणत्या चॅटवर ‘कंट्रोल’ ठेवायचा याचा निर्णय घेऊ शकतो.

वाचा- येणार.. येणार.. व्हॉट्सअॅप स्टेटस फीचर परत येणार!

फेसबुक

फेसबुकमध्ये मेसेजचे दोन ‘इनबाॅक्स’ असतात. हे साधारणपणे सगळ्यांना माहीत असतं. एक असतो तो आपल्या मित्रांकडून अालेले मेसेजेस दाखवणारा इनबाॅक्स तर दुसरा असतो तो ‘मेसेज रिक्वेस्ट’चा इनबाॅक्स. तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये नसलेल्या लोकांचे मेसेजेस् ‘मेसेज रिक्वेस्ट’ या इनबाॅक्समध्ये येतात. याशिवाय ‘फिल्टर्ड मेसेज रिक्वेस्ट्स’ हा अजून एक प्रकार असतो. हा इनबाॅक्स पाहण्यासाठी वेब ब्राऊझरवरून (म्हणजे गूगल क्रोम, मोझिला इ. वरून) फेसबुक ओपन करावं लागतं

आपल्या मुख्य इनबाॅक्सव्यतिरिक्तचे हे दोन मेलबाॅक्स अधूनमधून चेक करत राहणं चांगलं असतं. आपल्याला संपर्क करू पाहणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मेसेज त्यात अचानकपणे आपल्याला सापडू शकतो.

वाचा- विषाचा फवारा मारणाऱ्या कोब्रापासून तिने आपल्या लहानग्याला वाचवलं!

यूट्यूब

तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या एखाद्या आॅडिओ किंवा व्हिडिओ फाईलमध्ये काय म्हटलं आहे हे शब्दात लिहून हवं आहे का? अशा ‘ट्रान्सक्रिप्शन’साठीही तुम्ही यूट्यूबचा वापर करू शकता. यासाठी हा व्हिडिओ किंवा आॅडिओ यूट्यूबवर अपलोड करावा लागतो. आॅडिओ फाईलचं (तांत्रिकदृष्ट्या) व्हिडिओ फाईलमध्ये रूपांतर करता येतं. तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स यूट्यूबवर अपलोड झाली ती क्लिक करून ‘more’ हा आॅप्शन निवडला की ‘transcript’ हा पर्याय निवडून हे ट्रान्सक्रिप्शन मिळवता येतं. हे १००% बरोबर असेलच असं नाही. पण खूप मोठ्या फाईल्सच्या बाबतीत एक ढोबळ ट्रान्सक्रिप्शन मिळवून त्यात मग स्वत: सुधारणा करता येतात. आपलं काम त्याने बरंच हलकं होऊ शकतं.

Story img Loader