Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात एक व्यक्ती दिसत आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात अजून तीन मुलींचे चेहरे लपलेले आहेत. ज्यांना तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेक जणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रात लपलेल्या ३ मुली तुम्हाला दिसल्या का?

( हे ही वाचा: Optical Illusion: अननसांमध्ये लपलेले ४ कॉर्न तुम्ही शोधू शकता का? ९९% लोक ठरलीत अपयशी)

वडिलांच्या चित्राच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला आहे की, या चित्रात त्यांच्या तीन मुलीही कुठेतरी लपल्या आहेत, ज्यांना शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. तीक्ष्ण डोळे असणाऱ्यांना फ़क्त हे कोडे सोडवता येईल. अनेकांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही लोकांना हे कोडे सोडवता आलंय. जर तुम्हाला या चित्रात मुली दिसल्या असतील तर अभिनंदन! तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. मात्र, जर तुम्हाला अजूनही या मुली दिसल्या नसतील तर आम्ही तुमची मदत करू. व्यक्तीच्या मानेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला बारकाईने पहा, तुम्हाला दोन स्त्रियांची प्रतिमा दिसेल. तिसर्‍या मुलीचा शोध अजून बाकी आहे, त्यामुळे चित्राच्या दाढीसमोरील ठिपका बघा, तिसरी मुलगी देखील सापडेल.

येथे दडल्यात तीन मुली

( हे ही वाचा: Optical Illusion: घुबडांमध्ये लपलेली मांजर तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अयशस्वी)

जर तुम्हाला अजूनही चित्रात लपलेल्या मुली दिसल्या नसतील तर वरील चित्र बघा, तुम्हाला मुलींचे चेहरे कुठे लपलेत ते लगेच समजेल. लाल वर्तुळातील तीन मुलींचे चित्र पाहिल्यानंतर वर्तुळाशिवाय चित्र पाहिल्यास मुलींचा आकार आपोआपच दिसेल, असा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hidden in this persons face are his own 3 daughters can you find out in 20 seconds gps