Spiderman in Pune Clooged water पुण्यात थोडासा पाऊस झाला तरी रस्ते जलमय होतात, वाहतूक कोंडी होते आणि पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नाल्यांची अर्धवट सफाई, वारंवार रस्त्यांवर खोदकाम, मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्यात पाणी साचते, ज्याचा फटका वाहतूक कोंडीला बसतो. पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नाल्यांची सफाई आणि पावसाळी वाहिन्या तसेच गटारांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिका प्रशासनकडून करण्यात आला होता. पावसाळी वाहिन्या, गटारांची स्वच्छता नीट प्रकारे न झाल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मुखवटा घालून काही तरुण उतरले आहेत. तिथे स्पायडरमॅनचा मुखवटा घालून आणखी एक तरुण येतो. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना.

हेही वाचा – Dunzoचा शर्ट अन् Zeptoची बॅग घेऊन चोरट्यांनी केली चोरी, पुण्याच्या आलिशान सोसायटीतील CCTV Video Viral

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Small Boy Viral Video
प्राण्यांबरोबर चिमुकला करतोय जीवघेणे स्टंट; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
monkeys tried to attack a Leopard
‘टीम वर्क असावं तर असं…’ माकडांच्या कळपाने बिबट्यावर केला हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक
Shocking Photo a fish came out by tearing open the stomach of a bird flying in the sky
अविश्वसनीय! आकाशात उडत्या पक्षाचे पोट फाडून बाहेर आला मासा; ‘हा’ PHOTO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन मास्क घातलेले तरुण दिसत आहे ज्यांनी मास्क घातले आहे. साचलेल्या पाण्यात एकमेकांबरोबर हे भांडत आहे. तेवढ्यात स्पायडरमॅनचा मुखवटा घालून एक तरुण सायकलवरून उतरताना दिसतो. दोन्ही तरुणांचे भांडण सोडवतो. दोघांना साचलेले पाणी साफ करण्यासाठी बादली देतो आणि स्वत: हातात वायपर घेऊन साचलेले पाणी काढताना दिसत आहे. रस्त्याच्याबाजूला पदपथावर उभे असलेले लोक हे सर्व दृश्य पाहताना दिसत आहे.

हेही वाचा – प्रवाशांनी खचाखच भरलेली बस थेट पुलावरून कोसळली, २४ प्रवासी जखमी, थरारक घटनेचा Video Viral

व्हिडीओ इंस्टाग्रामवर rvcjinsta नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्युअर सिनेमा(Pure Cinema) मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, स्पायडर मॅन वॉटर ऑफ सिटी (Spider-Man City of water) दुसऱ्याने लिहिले, “त्यांचा अभिमान आहे. ते शहराची रक्षा करत आहेत”

Story img Loader