Spiderman in Pune Clooged water पुण्यात थोडासा पाऊस झाला तरी रस्ते जलमय होतात, वाहतूक कोंडी होते आणि पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नाल्यांची अर्धवट सफाई, वारंवार रस्त्यांवर खोदकाम, मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्यात पाणी साचते, ज्याचा फटका वाहतूक कोंडीला बसतो. पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नाल्यांची सफाई आणि पावसाळी वाहिन्या तसेच गटारांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिका प्रशासनकडून करण्यात आला होता. पावसाळी वाहिन्या, गटारांची स्वच्छता नीट प्रकारे न झाल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मुखवटा घालून काही तरुण उतरले आहेत. तिथे स्पायडरमॅनचा मुखवटा घालून आणखी एक तरुण येतो. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा