जगातले सगळ्यात उंच ठिकाण कुठले असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही हिमालय म्हणाल किंवा अजून एक दोन ठिकाणांची नावं घ्याल. पण, तुम्हाला माहित आहेत का जगातले सगळ्यात उंच पर्वत हे भारत आणि भारताच्या आसपासच आहेत. चला तर मग ते कोणकोणते पर्वत आहेत ते पाहूया.
०१. माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. १९५५ मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची ८,८४८ मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.
०२. के२- पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा २ हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के२ या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत ८,६११ मीटर उंच आहे.
०३. कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसऱ्या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची ८,५८६ मीटर आहे.
०४. ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.
०५. मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त १९ किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. ८,४८५ मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.
०६. चोयुः ८,२०१ मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.
०७. धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. ८,१६७ मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.
०८. मनास्लुः ८,१६३ मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस १९५६ मध्ये चढला होता.
०९. नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची ८, १२६ मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणं खुप कठीण मानलं जातं. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला ‘किलिंग माउंटन’ असेही म्हटले जाते.
१०. अन्नपूर्णाः ८,०९१ मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.
२३. नंदा देवीः ७,८१० मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत १९८८ पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा