HCL CEO C. Vijayakumar Package : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वांनाच माहिती आहेत. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेली ही एचसीएल कंपनी कमाईमध्येही अव्वल आहे. अशा कंपनीत सीईओ पदी असलेल्या सी. विजयकुमार यांचा पगार किती आहे माहितेय का? विजयकुमार हे सध्या सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ आहेत.
एचसीएल टेकने नुकताच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एचसीएल टेकचे सीईओ सी. विजयकुमार यांना गेल्या वर्षी १२३.१३ कोटी रुपये इतका पगार देण्यात आलाय. कंपनीने स्पष्ट केले आहे की दीर्घकालीन फायद्यांसाठी त्यात त्यांच्या उत्पन्नाच्या तीन चतुर्थांश भागाचाही समावेश आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विजयकुमार यांना वार्षिक २ मिलियन डॉलर (सुमारे १५ कोटी रुपये) मूळ वेतन मिळते. याशिवाय त्यांना दुसऱ्या पगारात २ दशलक्ष डॉलर्स मिळतात. ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षासाठी, त्यांना $०.०२ दशलक्ष रक्कम देण्यात आली. HCL ने सांगितले की $१२.५० दशलक्ष LTI मुळे त्यांचा एकूण पगार $१६.५२ दशलक्षच्या वर केला आहे.
२०२१ – २२ या वित्त वर्षात ब्रँडने निर्धारित केलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी एलटीआय रूपात USD १२.५ दशलक्ष इतकी रक्कम दिली आहे. एलटीआय हे २ वर्षांसाठी निर्धारित केलेले टार्गेट पूर्ण केल्याबद्दल दिली जाणारी रक्कम असते. वार्षिक अहवालात नमूद केले आहे. “त्यानुसार, LTI पेमेंट दोन वर्षांसाठी आहे जे ३१ मार्च २०२१ रोजी संपले. आर्थिक वर्ष २०१९-२० साठी USD ६.२५ दशलक्ष आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी USD ६.२५ दशलक्ष इतक आहे.”
आणखी वाचा : निष्काळजीपणाचा कळस! विमानातल्या जेवणात सापाचं डोकं, पाहा VIRAL VIDEO
जर त्यांच्या पगारातून LTI काढून टाकले तर मार्च २०२० ला संपलेल्या वर्षासाठी त्यांची कमाई सुमारे $१०.२७ दशलक्ष (सुमारे ८२ कोटी रुपये) होईल. विप्रोचे सीईओ थियरी डेलापोर्ट यांच्यापेक्षा सी. विजयकुमार यांचा पगार थोडा जास्त आहे. त्याचा पगार $१०.५ दशलक्ष इतका होता.
आणखी वाचा : बाप रे! घराचे वीज बिल आले तब्बल ३,४१९ कोटी रूपये, पाहून व्यक्ती हादरलाच, रूग्णालयात दाखल
दुसरीकडे, इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना एकूण कमाईमध्ये ४३% वाढ मिळाली आहे. त्यामुळे त्यांना २०२१-२२ मध्ये $१०.२ दशलक्ष पगार मिळाला. तर TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांना $३.३ दशलक्ष पगार मिळाला.