Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. याच सगळ्या घडामोडीच्या दरम्यान या परस्थितीवरून सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच क्रियेटीव्ह झालेत. एकनाथ शिंदे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, अशा अनेक राजकीय व्यक्तींवर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

वेगेवगळ्या वेब सिरीज, टीव्ही मलिका, सिनेमे यांचा आधार घेत हे मीम्स बनवले आहेत. फेसबुक, ट्विटरपासून अगदी व्हॉट्सअप स्टेटसलाही हे मिम्स दिसून येत आहेत.

Story img Loader