लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड बनले आहेत. लग्नाचे मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कधी वधू स्टेजवरून पडते, तर कधी वधू कॅमेरामनला थप्पड मारते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक वधू वरांना अनेक वेळा झापड मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्ही असेही म्हणाल की वधूने योग्य काम केले. वास्तविक, वर वधूला गुटखा खात असल्याचे समजताच. ते पाहून ती संतापली आणि वराला झापड मारली आणि त्याला गुटखा थुंकून येण्यास सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेटीझन्सची व्हिडीओला पसंती

हा व्हिडीओ official_niranjanm87 नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की वधू आणि वर बसलेले आहेत आणि वधू खूप रागावली आहे. याचे कारण असे आहे की वधूला जेव्हा कळते की वर गुटखा खाऊन मंडपात आला आहे, तेव्हा वधू चिडते आणि वराला झापड मारून गुटखा थुंकण्यास सांगते. एवढेच नाही तर वधू रागाच्या भरात जवळ बसलेल्या व्यक्तीला अनेक झापड देखील देते.

वधूला नेटीझन्सचा सपोर्ट

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही अशी चूक करू नये. गुटखा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि ते आपल्या शरीराला हानी पोहोचवते, यामुळे सरकारही लोकांना गुटखा न खाण्याचा सल्ला देखील देते. अनेकजण व्हिडीओवर टिप्पणी करत वधूने वराला योग्य धडा शिकवल्याचे सांगितले आहे.

या व्हिडीओवर तुमचं मत काय?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious moment bride beats groom for chewing gutka during wedding rituals ttg
Show comments