मानवी स्वभावाचा एक वाईट गुण आहे. एखाद्यी गोष्ट करायची नाही असं सांगितलं की तिच करण्याची खोड मानवी स्वभावात असते. वरील वाक्याला साजेसा असा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वॉशिंग्टनमधल्या ‘इंटरनॅशनल स्पाय म्युझिअम’मध्ये शार्क मासे असलेला मोठा टँक ठेवण्यात आला आहे.
खरं तर संग्रहालयात येणाऱ्या प्रत्येकाला तिथल्या वस्तूंना हात लावून पाहण्याचं कुतूहल असतं, वस्तूंना हात लावू नये असं वारंवार बजावलं तरी लोकं ऐकतात थोडीच, तेव्हा लोकांची थोडी फिरकी घेण्यासाठी या संग्रहालयानं शार्क माशांच्या टँकशेजारी एक सूचना फलक लावला. ‘ टँकला स्पर्श करा पण काही झालचं तर तुम्ही जबाबदार’ अशी सूचना तिथे लावली होती. पण एका व्यक्तीनं टँकला स्पर्श करण्याचा नाठाळपणा केलाच. त्यानं स्पर्श केल्यानंतर टँकमधून शार्क आली आणि तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण टँकची काच असल्यानं तिची जोरदार धडक काचेवर बसली आणि टँकला तडे गेले. शार्कच्या अनपेक्षित हल्ल्यानं तो खाली पडला.
‘ओला’चा दिलदारपणा, वैतागलेल्या ग्राहकासाठी कंपनीनं काय केलं पाहा
Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल
खरं तर शार्कने हल्ला केलाच नव्हता, काचेच्या पलिकडे टीव्ही बसवला होता ज्याची या व्यक्तीला कल्पना नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या व्यक्तीची भन्नाट प्रतिक्रिया संग्रहालयात असणाऱ्या कॅमेरात कैद झाली अन् हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.