Himachal pradesh flood viral video: चप्पल, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, फॉइल, खाद्यपदार्थांची पाकिटे, कपडे, लाकडाचे तुकडे आणि बरेच काही..नदीने आम्हाला आमचे सामान परत दिले आहे. होय, IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो हिमाचल प्रदेशातील पुराचा अआहे. हा व्हिडीओ एका पुलाचा असून तो कचऱ्याने भरलेला दिसत आहे. २९ सेकंदांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जणू संतप्त झालेल्या नदीने पुलाच्या माथ्यावर आदळून आम्हा मानवांनी पसरवलेला कचरा परत केल्यासारखे वाटते आहे..आपल्याला पोसणारा निसर्ग जेव्हा क्रूर होतो, निर्दयी होतो तेव्हा विक्राळ काळाच्या पायाखाली, त्याच्याच पिलांना चिरडून टाकतो हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय.

आपलीच घाण आपल्याला परत केली..

पुलाखालील नदीच्या पाण्याचा आवाज भयावह आहे. आजकाल डोंगराळ प्रदेशात आजूबाजूच्या मैदानी भागातील लोक पर्यटनाच्या नावाखाली बिनदिक्कतपणे अस्वच्छता पसरवतात असा ट्रेंड निर्माण झाला आहे. किंबहुना डोंगर असो की जंगल लोक कचरा करतातच. शहरातील लोक केवळ आनंदासाठी तेथे येतात आणि पर्यटनस्थळांना घाण करतात. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जे देतो तेच परत मिळतं असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे.

Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Syphilis cases increase in city Mumbai
सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
fraud with hundreds of employees by promising permanent jobs in health department
कायमस्वरूपी पदासाठी लाखो रुपये उकळले; आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक
A brutal attack by a crocodile on a buffalo
‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Sewage channel cover Pune, Pune roads,
झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बापरे! पाकिस्तानात आई-बाबा आणि ७ मुलांचा एकाच दिवशी जन्म; “अल्लाहची देणगी” असल्याची दिली प्रतिक्रिया

लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो म्हणतो, ‘भाऊ, मरण पहायचे असेल तर इकडे बघ.’ आपण नद्या आणि पर्यावरणाशी कसे वागतो याबद्दल व्हिडिओ गंभीर प्रश्न उपस्थित करतो. या व्हिडीओतून असे अधोरेखित होते की आपण जे प्रदूषण करतो त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. या व्हिडीओद्वारे भविष्यातील संकटं ओढवण्याआधी माणसांनी पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader