Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, मान्सून दाखल होताच कहर झाला आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे हिमाचलमधील सर्वच नद्या दुधडीभरून वाह्त आहेत. संततधार पाऊस आणि ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील बागी आणि मंडीसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बाजारात मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वाहने वाहून गेली आहेत.
मंडईतून वाहणाऱ्या पाण्यामुळे बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मंडीतील सेराजच्या तुंगाधर आणि कुल्लूमधील मोहल खड्डय़ात पुरामुळे मोठ्याप्रमाणात वाहने वाहून गेली असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत असून आतापर्यंत २०० जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. राज्यभरात सध्या ८५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे, कालका-शिमला रेल्वे मार्गावर डोंगरावरून दगड, मलबा आणि झाडे पडल्याने सलग दुसऱ्या दिवशी सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Mumbai rain: पहिल्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली, पुढचे ४८ तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी
हेही वाचा – “भर पावसात जो छत्री शेअर करतो तोच खरा मित्र”, दोन पोलीस मित्रांचा Video होतोय तुफान व्हायरल
हिमाचलमध्ये सध्या पर्यटनाचे दिवस सुरु असले तरीही इथं पावसामुळं बरीच संकटं ओढावताना दिसत आहेत. शिमलातील रामपूर येथे असणाऱ्या सरपारा गावात ढगफुची झाल्यामुळं अनेर घरांचं नुकसान झालं.