Hindu Gods Photo Stomped By Congress, Viral Video Facts: लाइटहाऊस जर्नालिज्मला १ मिनिट ५० सेकंदांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गंभीर वादाचं कारण ठरत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओसह असा दावा करण्यात आला होता की, व्हिडिओमध्ये दिसणारे लोक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि ते हिंदू देवतांच्या प्रतिमा असलेल्या पोस्टर्सवर उड्या मारत आहेत. तपासादरम्यान, आम्हाला या व्हिडीओची वेगळीच बाजू दिसून आली आहे. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या मोर्चाचा या व्हिडीओशी असलेला संबंध देखील उघड झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय व त्यात किती तथ्य आहे हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Angry Bird ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलच्या क्रोम एक्सटेंशन मध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही त्याद्वारे मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केलं. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला X वर इंडिया अवेकनेडची पोस्ट आढळली.
पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, व्हिडीओमध्ये हिंदू देवाचे चित्र असलेले पोस्टर्स पायदळी तुडवण्याचे भाजप महिला मोर्चाचे लज्जास्पद कृत्य दाखवण्यात आले आहे.आम्हाला दुसऱ्या वापरकर्त्याची पोस्ट देखील आढळली ज्याने असेही नमूद केले होते की व्हिडिओमध्ये भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
कीवर्ड शोधताना आम्हाला फ्री प्रेस जर्नलमध्ये घटनेबद्दल एक बातमी सापडली.
रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी शुक्रवारी इंदूरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्या घराबाहेर आंदोलन केले. पटवारीने माजी मंत्री डबरा इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यावर आक्षेप घेत शेकडो महिला इंदूरमधील बिजलपूर येथील पटवारीच्या निवासस्थानी हातात बांगड्या घेऊन पोहोचल्या. या बातमीत मध्य प्रदेशच्या काँग्रेस प्रदेश प्रवक्त्याने केलेली पोस्ट सुद्धा होती
या बातमीत काँग्रेसच्या जितू पटवारी यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवर स्पष्टीकरण देखील दिले आहे.
आम्हाला या घटनेबद्दल आणखी काही बातम्या देखील मिळाल्या.
निष्कर्ष: संतप्त भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जितू पटवारीचे भगवान रामाचे पोस्टर पायदळी तुडवल्याचा व्हिडीओ काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिंदू देवतांच्या पोस्टरचा अनादर करत असल्याचा खोटा दावा करत केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.