Video : भारतीय संस्कृतीत लग्नाला विशेष महत्त्व आहे. लग्न या पवित्र बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात.
भारतीय विवाह व्यवस्थेत अनेक रुढी परंपरा पाळल्या जातात. काही प्रथा खूप मजेशीर असतात.
सोशल मीडियावर लग्नातील अशा अनेक प्रथांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नाच्या स्टेजवर नवरदेव नवरी यज्ञासमोर बसलेले दिसत आहेत. नवरदेवाच्या पाठीमागे नवरीचे भाऊ म्हणजेच मेहुणे बसलेले आहेत. त्यातील एका मेहुण्याने नवरदेवाचा कान पकडला आहे. खूप वेळपर्यंत मेहुणा असाच कान पकडून राहतो, तेव्हा नवरदेवाला त्रास होतो आणि तो ओरडू लागतो.
नवरदेवाचा हा त्रास नवरीला सहन होत नाही, तेव्हा ती मध्यस्थी करते आणि भावाला नवरदेवाचा कान सोडायला सांगते. सध्या हा अनोख्या प्रथेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Marathi kattaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर अनेक युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले आहे, “बायकोला काळजी आहे नवऱ्याची”, तर एका युजरने लिहिले आहे, “भावा तुझं काही खरं नाही, तू बघ आता.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “हा भाऊ आता बहिणीचं लग्नच मोडणार.”