अंकिता देशकर
Shirdi Saibaba Mandir Viral Video: लाईटहाऊस जर्नलिज्मला एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ शिर्डी साईबाबा मंदिराचा आहे. या व्हिडिओ मध्ये लोकं देणगी मोजताना दिसतात.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Mani (Jai Shree Ram) ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत हिंदी मध्ये लिहिले की, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हिंदूंनी दिलेली देणगी कुठे जातेय स्वतःच पाहा. एवढं व्हायरल करा की देशातील एक एक हिंदू ज्याचे डोळे अजून बंद आहेत त्यांच्यापर्यंत हे सत्य पोहोचायला हवे.
Shirdi temple is not for sanatanis
Free Hindu Temples
बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करून या व्हिडिओ चा तपास सुरु केला. आम्ही यातून काही किफ्रेम्स मिळवल्या आणि त्यांना निरखून पाहिले. आम्हाला कळले कि या व्हिडिओ मध्ये दिसत असलेले पैसे हे भारतीय रुपये नाही. आम्हाला समजले कि हे बांगलादेश चे चलन टका आहेत. तसेच व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या पोत्यांवर बंगाली भाषेत लिहले होते. या मिळालेल्या संकेतांमधून आम्हाला कळले कि हा व्हिडिओ भारताचा नसून बांग्लादेशचा असू शकतो.
आम्ही, ‘Money and donation counting in a mosque’ असे किवर्डस वापरून पुढचा तपास सुरु केला. आम्हाला risingbd.com या वेबसाईट वर अपलोड केलेले एक आर्टिकल आणि एक व्हिडिओ सापडला.
लेखात म्हटले आहे: किशोरगंज शहरातील हरुआ येथील ऐतिहासिक पगला मशिदीच्या आठ दान तिजोरी उघडताना टाकाच्या एकूण १९ पोती सापडल्या आहेत. आम्हाला हा व्हिडिओ Kishoreganj | Somoy TV या युट्युब चॅनेल वर देखील सापडला.
Jago News या युट्युब चॅनेल वर देखील आम्हाला व्हायरल होत असलेला व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ एक महिना पूर्वी अपलोड करण्यात आला होता.
आम्हाला या संदर्भात काही बातम्या देखील सापडल्या.
बातमीत म्हटले आहे: किशोरगंज जिल्ह्यातील नरसुंदर नदीकाठावर असलेल्या पौराणिक २५० वर्ष जुन्या पगला मशिदीच्या आठ दानपेट्यांना ४. १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी देणग्या मिळाल्या आहेत.
निष्कर्ष: शिर्डी साई मंदिरातील असल्याचा दावा केलेल्या देणगीची रक्कम मोजतानाचा व्हायरल व्हिडिओ बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील पगला मशिदीचा आहे.