Hindu Sadhavi- Muslim Man Wedding: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला एक फोटो आढळून आला. साध्वी रश्मिकाने मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्याचा दावा या फोटोसह केला जात होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की व्हायरल फोटोत छेडछाड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Moonjas-official ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करत आहेत.

तपास:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.’बालमुकुंद आचार्य हातोज धाम’ नावाच्या फेसबुक प्रोफाइलवर गेल्या वर्षी अपलोड केलेला फोटो आम्हाला आढळला

फोटोवरील मजकुरात असे म्हटले आहे की, फोटो निवडणूक कार्यालयातील आहे आणि डावीकडे दिसणारी व्यक्ती स्त्री नसून पुरुष असल्याचे आम्हाला दिसले. डावीकडे दिसणारी व्यक्ती म्हणजे भाजपाचे बालमुकुंद आचार्य. त्यांच्या मतदारसंघातील मांसाहारी दुकाने बंद करण्याच्या मोहिमेनंतर आचार्य यांनी जयपूरमधील मुस्लिम हॉटेलच्या मालकाची भेट घेतली तेव्हा वाद सुरू झाला. पुढे आम्हाला फोटोत दिसणारी व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट करणारे फेसबुक पेज देखील सापडले

टोपी घातलेला माणूस उस्मान चौहान आहे, जो दीर्घकाळापासून भाजपाशी संबंधित आहे, असे मजकूरात म्हटले आहे. त्यांचे हातमागाचे दुकान असून यापूर्वी ते अल्पसंख्याक मोर्चा आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे पदाधिकारी होते. पेजने असेही नमूद केले आहे की, लोक एमएम खान हॉटेलचे मालक असल्याचा दावा करून खोट्या बातम्या शेअर करत आहेत.

तो राजस्थानमधील ‘एमएम खान’ हॉटेल चालवणारा माणूस असल्याचा दावा करणाऱ्या काही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आम्हाला आढळल्या.

https://rajasthan.ndtv.in/rajasthan-news/meat-shops-will-not-run-in-the-open-this-is-not-karachi-bjp-mla-balmukund-acharya-who-threatened-shopkeepers-has-now-apologized-4637669

आम्हाला बालमुकुंद आचार्य हातोज धाम यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर अपलोड केलेले फोटो देखील आढळले, जिथे टोपी घातलेला तोच माणूस दिसत होता.बालमुकुंद आचार्य यांना भेटण्यासाठी मुस्लिम समाजाचे अनेक पदाधिकारी जमले होते, असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

निष्कर्ष: भाजपा नेते बालमुकुंद आचार्य आणि आणखी एक माजी पदाधिकारी उस्मान चौहान यांचे एडिटेड फोटो खोटे दाव्यांसह शेअर केले जात आहेत. व्हायरल फोटो बनावट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu sadhavi muslim man wedding did rashmika marry hotel owner viral photo fact check came in light after trolling svs
First published on: 02-07-2024 at 14:52 IST