– अंकिता देशकर
Temple Under Egypt Pyramid: ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या चित्रात इजिप्तचा पिरॅमिड दिसतो तसेच, खाली काही खांब दिसतात. असा दावा करण्यात येत आहे की उत्खनन करताना तिथे एक हिंदू मंदिर सापडले. इथे खाली सूर्य मंदिर होते आणि त्यावर पिरॅमिड्स बांधण्यात आले, असाही दावा करण्यात आला आहे. या फोटोचे सत्य काय आहे हे जाणून घेऊ या..
काय होत आहे व्हायरल?
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला हे फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.
तपास:
तपासाची सुरुवात ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून केले. आम्हाला हे चित्र २० ऑक्टोबर, २०१५ रोजी foxnews.com वर प्रकाशित झालेले एका आर्टिकलमध्ये सापडले. त्याचे इंग्रजीमध्ये शीर्षक होते: Ancient priest’s tomb painting discovered near Great Pyramid at Giza, (गिझा येथील ग्रेट पिरॅमिडजवळ प्राचीन मंदिराचे पेंटिंग सापडले.)
या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते: इजिप्तमधील गिझा येथील ग्रेट पिरॅमिडपासून अवघ्या १००० फूट अंतरावर एका पिरॅमिडमध्ये सापडलेल्या पेंटिंगमध्ये प्राचीन जीवनाची दृश्ये दर्शविली आहेत. (फोटो सौजन्याने मॅक्सिम लेबेडेव्ह)
हेच चित्र आम्हाला, livescience या वेबसाइटवरील आर्टिकलमध्ये सापडले, हे आर्टिकल १५ जुलै २०१४ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. आम्हाला या उत्खननाचे काही अजून फोटो सापडले.
या बातम्यांद्वारेच आम्हाला कळले की २०१२ मध्ये रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीजच्या टीमने हे पेंटिंग शोधले होते, जे १९९६ पासून या पिरॅमिडचे उत्खनन करीत आहे. आम्ही ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे वेबसाइटदेखील तपासले. त्यांच्या रिसर्च सेक्शनमध्ये आम्हाला या उत्खननाचे चित्र आणि व्हिडीओदेखील सापडले.
हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने, ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’, रशिया, यांना व्हायरल चित्रावर ऑफिशिअल कमेंटसाठी संपर्क केला आहे. त्यांचे उत्तर येताच हे फॅक्ट चेकदेखील अपडेट करण्यात येईल.
निष्कर्ष:
इजिप्तच्या पिरॅमिडच्या खाली मंदिर सापडले नाही.