Hippo and Lion Fight Video वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात; जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना मोठ्या आवडीने पाहायला आवडतात. सिंह आणि चित्ता यांसारखे प्राणी बहुतेक वेळा शिकार करताना दिसतात; तर माकडांसारखे प्राणी सदैव मस्ती करीत असतात. वन्य जीवन समोर जरी पाहता नाही आलं तरी अशा व्हायरल व्हिडीओंमधून अनुभवायला मिळत असतं. कोणता प्राणी कधी कोणावर हल्ला करील याचा नेम नसतो. जंगलातील प्राणी तर एकापेक्षा एक भयानक शिकारी असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करून आपलं पोट भरत असतात. ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात. वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. कधी कोण कोणाच्या तावडीत सापडेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वच प्राणी आपला जीव मुठीत घेऊन फिरत असतात. सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय; जो पाहून लोकदेखील विचारात पडले आहेत.

जंगलातील सर्व प्राण्यांमध्ये सिंह-सिंहिणींची भीती दिसून येते. ते नेहमी शिकार शोधताना दिसतात. कोणतंही सावज दिसताच सिंह आणि सिंहिणी त्याची शिकार करतात. असं म्हटलं जातं की, सिंहाशीसोबत वैर करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. जंगलात कदाचितच कोणता प्राणी असा असेल की, जो या प्राण्यासोबत लढण्याची हिंमत करीत असेल. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सात सिंहिणी एकाच पाणघोड्याशी लढताना दिसत आहेत.

(हे ही वाचा : पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल )

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सात सिंहिणी तलावाच्या काठावर विसावताना दिसत आहेत. थोड्या वेळातच तलावाच्या काठावरून एक पाणघोडा जाताना दिसतोय. त्याला पाहताच सात सिहिंणी आधी घाबरतात. एकेक मागे पाऊल टाकू लागते आणि पाणघोडा हळूहळू पुढे येताना दिसतोय. मग सिंहिणींनी योजना आखली आणि त्या पाणघोड्याची शिकार करायचं ठरवलं. सर्वांनी मिळून त्याला आजूबाजूनं घेरलं आणि मग त्या सिंहिणीनी त्या पाणघोड्यावर हल्ला केला. पाणघोड्यानंही न घाबरता, त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली; पण तो त्यांना फार काळ तोंड देऊ शकला नाही. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पाणघोड्यानं धूर्तपणा दाखवला आणि तो तिथून पळून जात पाण्यात उतरला.

फ्रेममध्ये कैद झालेल्या सिंहिणी आणि पाणघोडा यांच्यामधील भांडणाचे दृश्य खरोखरच धक्कादायक आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

अशा प्रकारे पाणघोडा त्यांच्यापासून दूर पाण्यात पळून गेल्यामुळे सिंहिणी हात चोळत राहिल्या. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्कशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. लेटेस्ट साइटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर तो अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओलाही जवळपास १० लाख व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.


मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hippo and lion fight video hippopotamus charges at a pride of lionesses pdb