होळीनंतर येणारा धूलिवंदन सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विविध रंगाच्या रंगात सारे न्हाऊन निघत असताना गुगल का बरं मागे हटेल? दरवर्षीप्रमाणे गुगलनं यावर्षीही धूलिवंदन निमित्त खास डुडल तयार केलं आहे.  धूलिवंदनाच्या विविध रंगात रंगून गेलेलं डुडल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

धुळवडीचा रंग काढण्यासाठी या सोप्या टिप्सचा करा वापर

दरवर्षी गुगल इंडिया भारताच्या विविध सणांमध्ये आपला सक्रिय सहभाग दाखवताना दिसत आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचं खास डुडल गुगलद्वारे तयार केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सण उत्सवांनाही गुगल डुडलच्या यादीत एका वेगळं स्थान मिळताना दिसत आहे. यंदाचंही डुडल गुगलनं काहीसं हटके ठेवलं आहे. होळीनंतर येणारा धूलिवंदनाचा सण देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या रंगोत्सवाची छोटीशी झलक गुगलच्या डुडलमध्ये दिसत आहे.

Holi 2019 : घरच्या घरी तयार करा थंडाई !

भारतात रंगाच्या उत्सवाला मोठं महत्त्व आहे. विशेष करून उत्तर भारतात रंग मोठ्या प्रमाणात खेळले जातात. म्हणूनच बहुरंगी भारतीय संस्कृतीची झलक गुगलनं आपल्या डुडलमधून दाखवली आहे.

Story img Loader