Holi 2024 Marathi Greetings, HD Images, Wishes: आला होळीचा सण लई भारी..थंडीला रामराम करत आता वसंत ऋतूची नांदी होत असल्याचे संकेत देणारा सण म्हणजेच होळी यंदा २४ मार्च २०२४ ला साजरी होणार आहे. आतापर्यंत तुमची सुद्धा होळीची जय्यत तयारी झाली असेलच. अलीकडे कोणताही सण म्हटला की WhatsApp, FB, Instagram, YouTube, अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शुभेच्छा द्यायलाच लागतात, असा एक अलिखित नियमच आहे असंही आपण म्हणू शकता. आनंदाच्या क्षणी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण आहे हे सांगण्याचं हे एक माध्यम म्हणता येईल. तुमच्या एखाद्या मेसेजने जर समोरच्याला आनंद होणार असेल तर तो मेसेजही तितकाच खास हवा ना? म्हणूनच आज आम्ही होळी विशेष शुभेच्छांची छान व सुंदर ग्रीटिंग्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आपल्या WhatsApp स्टेटस किंवा पोस्टमध्ये हे फोटो शेअर करून तुम्हीही इतरांना शुभेच्छा द्यायला विसरू नका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा