होळीचा सण आपण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करतो. परंतु भारतात अशी काही गावे आहेत जिकडे होळीच्या सणाला दुखोटा पाळला जातो. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील खजुरी आणि जलालपूर धई या दोन गावांचा सहभाग होतो. येथे कित्येक दशकांपासून होळीच्या दिवशी कडक दुखवटा पाळला जातो.
या दोन्ही गावांमध्ये होळीच्या दिवशी मुघलांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यामध्ये कित्येक गावकऱ्यांची हत्या झाली असल्याचे स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीनुसार समोर आले आहे. तसेच मुघलांनी गावकऱ्यांच्या रक्ताने होळी खेळल्याने गावकऱ्यांनी या सणाच्या दिवशी दुखवट्याच्या दिवशी दुखवटा पाळण्याची प्रथा सूरु केली आहे.
खजुरी गावात एक अतिशय भव्य दिव्य, अलिशान आणि सुंदर असा किल्या होता. कित्येक दिवसांपासून मुघलांना हा किल्ला काबीज करायचा होता. होळीच्या दिवशी मुघलांनी डाव रचून किल्ला काबीज केला आणि सुरुंग लावून उद्धस्तही केला. यामध्ये अनेक गावकऱ्यांचा जीव गेला. त्या दिवसापासून खजुरीमध्ये होळी उत्साहात साजरी करण्याऐवजी दुखवटा पाळला जातो.
जलालपूर धाई गावावर जमालुद्दिन या मुघलाचा डोळा होता. त्यावेळी या गावामध्ये धईसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तसेच गावाच्या परंपरेनुसार होळीच्या दिवशी कोणतेही शस्त्रास्त्र धईसेन आणि त्याचे सैनिक हातात घेत नव्हते. या संधीचा फायदा घेऊन जमालुद्दिननी राज्यावर हल्ला चढवला आणि युद्धात राजा धईसेन शहीद झाला. त्यानंतर या गावात होळीच्या सात दिवसानंतरच्या सोमवारी किंवा शुक्रवारी होळी साजरी केली जाते.