Viral video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसत आहे.यानिमित्त लोक एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद लुटतात. देशाच्या विविध भागांत होळी वेगवगेळ्या प्रकारे खेळली जाते आणि सणाचा आनंद लुटला जातो. याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात होळी खेळणाऱ्या लोकांच्या गर्दीत चक्क एका पिसाळलेल्या बैलाने एंट्री घेतल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच एका संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय.

बैल हा शांत प्रवृत्तीचा प्राणी असला तरी एकदा का तो पिसाळला की मग समोरच्याची काही खैर नाही. आताच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात होळी खेळण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. लोक होळीचा आनंद लुटत असतात तितक्यात तिथे बैल येतो आणि सर्वांना आपल्या शिंगांनी मागे सारत तो तिथून पूढे पळू लागतो. सुरवातीला लोकांना काही समजत नाही मात्र काहीच क्षणात तिथे मीठ गोंधळ उडतो आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढू लागतात. हे संपूर्ण दृश्य फार भयानक वाटू लागते मात्र यात फार काही लोकांना दुखापत झाली नसावी. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते अद्याप समजले नसले तरी याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओतील बैलाचा थैमान याहून युजर्स आता आवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ @yespriyanshu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बैलालाही आवरला नाही होळी खेळण्याचा मोह” तर आणखी एकानं “वाहह होळी झाली सगळ्यांची” अशी प्रतिक्रिया दिली आहे.