हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रियो हा पर्यावरण संरक्षणासाठी करत असलेल्या प्रयत्नांसाठी सुद्धा ओळखला जातो. लिओनार्डो डि कॅप्रियोचं नाव आता विज्ञानाच्या जगात सुद्धा झळकणार आहे. कारण युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञांनी आफ्रिकेत सापडलेल्या एका नवीन झाडाला ‘डिकॅप्रिओ ट्री’ असं नाव दिलं आहे.

पीअर जे या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, कॅमेरूनच्या इबो जंगलात आढळणाऱ्या एका झाडाला अधिकृतपणे ‘उवेरिओप्सिस डी कॅप्रिओ’ असं नाव देण्यात आलं आहे. यूकेमधल्या रॉयल बोटॅनिक गार्डन्समधील वैज्ञानिकांनी अधिकृतपणे नाव दिलेली ही विज्ञानातील पहिली नवीन वनस्पती आहे. ‘DiCaprio Tree’ सुमारे १३ फूट उंच आहे, त्याच्या खोडावर मोठी, चमकदार पिवळी-हिरवी फुले आहेत. २०२० मध्ये कॅमेरूनच्या इबो जंगलात वृक्षतोडीचे करार रद्द करण्यासाठी डि कॅप्रिओने केलेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ शास्त्रज्ञांनी या झाडाचं नाव ‘डिकॅप्रिओ ट्री’ चं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Celebrity MasterChef faisal shaikh and usha nadkarni dance on badshah new song
Celebrity MasterChef: फैजूचा उषा नाडकर्णींबरोबर बादशाहच्या गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Bollywood actress Ayesha jhulka wild card entry in celebrity masterchef
Celebrity MasterChef मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आता किचनमध्ये लावणार तडका
western ghat scorpion loksatta news
विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध; प्रदेशनिष्ठ प्रजाती असल्याचे अभ्यासातून स्पष्ट
Amruta Fadnavis New Song
VIDEO : “मी पुन्हा येतेय”, अमृता फडणवीस नव्या-कोऱ्या गाण्यातून भेटीला येणार!
‘Forest Bathing’ म्हणजे काय? कॅन्सरवर मात करण्यासाठी राजकुमारी केट याचा उपयोग कसा करत आहे?
pranit more assaulted for joke on veer pahariya
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईने दुकानदाराला दिले पैसे, एका दिवसात ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

डि कॅप्रिओने कॅमेरूनच्या इबो जंगलात झाडे तोडण्याच्या योजनेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट्सची सीरिज सुरू केली होती. या मोहिमेत कॅमेरूनच्या अधिकार्‍यांकडे एका याचिकेवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं. याचिकेत कॅमेरोनियन अधिकाऱ्यांना इबो फॉरेस्टचा काही भाग साफ करण्याची योजना मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं. ही मोहिम यशस्वी ठरली आणि त्यानुसार ऑगस्ट २०२० मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. इबोच्या जंगलातील सुमारे अर्ध्या भागात लाकूड तोडण्याची परवानगी देण्याची योजना होती.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : OMG! मार्केटमध्ये शॉपिंग करताना अचानक साप दिसला आणि…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

इबो फॉरेस्ट हे आफ्रिकेतल्या कॅमेरूनमध्ये उरलेल्या सर्वात मोठ्या पर्जन्यवनांपैकी एक आहे. ते बॅनन आदिवासी लोकांचं तसेच असंख्य आश्चर्यकारक वनस्पती आणि प्रजातींचं घर आहे. कॅमेरूनच्या नॅशनल हर्बेरियमचे शास्त्रज्ञ इबो जंगलातील वनस्पती प्रजातींचं दस्तऐवजीकरण करत आहेत.

आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

गेल्या वर्षी केव शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकार्यांनी २०० हून अधिक वनस्पती आणि बुरशींना अधिकृतपणे नाव दिले होते, ज्यात त्याच जंगलातील गुलाबी लिली, ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारी तंबाखूची वनस्पती आणि ताऱ्यासारखी फुले असलेले ऑर्किड यांचा समावेश होता. मादागास्कर बेटावरून हे फुल अंधारात वाढू शकतं.

Story img Loader