स्वत:चे अलिशान घर असावं असे स्वप्न प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती पाहतोच. वाढत चाललेल्या घरांच्या किंमती आणि महागाईमुळे अनेकांची स्वप्न अपुरीच राहतात. पण अशात तुम्हाला कोणी सांगितले की, एका ठिकाणी फक्त ७५ ते ८० रूपयांत घर विकत मिळतेय. कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. इटालीमधील सिसलीच्या गई गावात एक यूरो म्हणजेच ७८ रूपयांत घरांची विक्री सुरू आहे. जवळपास ४०० घरांच्या विक्रीसाठी लिलाव घेण्यात आला आहे.
एवढी कमी किंमत आणि अलिशान घरं असतानाही लोकांनी फारशी रूची दाखवली नाही. रशिया आणि ब्रिटनमधील लोकांनाच फक्त हे घरं खरेदी करता येणार आहे. त्यात विशेष म्हणजे एवढ्या कमी किंमतीत घर विकण्यामागे एक महत्वाचे कारण दडलेय. १९६८ मध्ये येथे झालेल्या भुंकपामुळे परिस्थिती बदलली आहे. येथील लोकांनी रोजगारासाठी शहराकडे पलायन केले. त्यानंतर येथे बोटांवर मोजण्याएवढे लोक आणि घरेच राहिली.
ज्या जागांवर या घरांची विक्री केली जात आहे. तो परिसर भीतीदायक आहे. या जागांवर नैसर्गिक आपत्ती सारख्या घटना घडत असतात. याव्यतिरिक्त या भागात रोजगाराची देखील काही सुविधा नाही आहे. येथे मोठ्या संख्येनं घरं रिकामी आहेत. याच कारणानं कमी किंमत दाखवून ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जानेवारी २०१९ मध्ये येथील घरांची विक्रिची जाहिरात केली होती. बेस प्राइज एक युरो म्हणजे फक्त ७८ रूपये असल्याची माहिती या जाहीरातीत दिली होती.