अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, एकवेळ अन्न आणि वस्त्रांची सोय करता येईल पण निवा-याचे काय हो? परवडणा-या किंमतीत राहायला घर न मिळणे ही अनेकांची मोठी समस्या आहे. आज जग विकसित होत चाललं आहे, माणसाला सोयी सुविधा मिळत आहे पण परवडणा-या किंमतीत घर न मिळणे ही मोठी समस्या बनत चालली आहे. हाँगकाँग सारख्या देशात तर अनेक लोक एक ते दीड चौरस फुटांच्या घरात राहत आहे. जागे आभावी जपानमध्येही छोट्या छोट्या घरांची संकल्पना रुजू होत आहे. तर कुठे अनेक जण पक्की घर नसल्याने तंबूत आपला संसार थाटत आहे. ज्यांना काही काळासाठी घराची समस्या भेडसावत आहे अशांसाठी मार्टिन अझुआ यांनी अनोखं घर आणले आहे. असे जर जे कोणीही खिश्यात घेऊन फिरू शकतो. काय आश्चर्य वाटलं ना?

वाचा : फक्त ५०६ टन सामान घेऊन सौदी राजा निघाला इंडोनेशियाला

वाचा : घर की खुराडा? तरीही लोक देतात २० हजार घरभाडे

घर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर किचन, बेडरुम्स, हॉल असलेलं घर उभं राहतं. पण अनेकांसाठी डोक्यावर छप्पर असलं तरी पुरेसं असते. ज्यांच्याकडे घर नाही त्यांच्या घराच्या संकल्पनाच वेगळ्या असतात. जिथे शांत डोकं ठेवता येईल अशी जागा त्यांना पुरेशी असते. म्हणूनच अशांसाठी मार्टीनने हे फोल्डेबल घर बनवले आहे. हे घर खिशात घेऊन ते फिरू शकतात. एका विशिष्ट प्रकारच्या कापडापासून हे घर बनवण्यात आले आहे. जर बाहेरचं हवामान थंड असेल तर घरातलं तापमान उबदार राहतं, जर बाहेरचं तापमान उष्ण असेल तर या घरातलं तापमान थंड राहतं असा दावा मार्टिनने केला आहे. गरज असेल तेव्हा यात हवा भरायची की झालं घर तयार. जर गरज नसेल तर या घराची घडी घालून खिशातूनही हे घर फिरवू शकता. आहे की नाही मस्त कल्पना, त्यामुळे यापुढे जर मी घर खिशात घेऊन फिरतो असं ऐकायला आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Story img Loader