जगातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांच्या गोंडस गोष्टी आवडतात. अनेकदा लहान मुलं मोठ्यांपेक्षा जास्त हुशारीचं काम करून प्रसिद्धीझोतात येतात. सध्या सोशल मीडियावर दोन लहान मुलांचा एक गोंडस व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणार्या निरागस मुलानं असं काम केलंय जे पाहून सगळेच खूश होतील. याच कारणामुळे या व्हिडीओला सोशल मीडियावरील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं एकमेकांसमोर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एक मुलगा अचानक नाचू लागतो. त्याचवेळी, दुसरा मुलगा डान्स करत असलेल्या मुलाकडे येतो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर समोरच्या मुलानेही त्याला घट्ट मिठी मारलेली दिसून येतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वचजणांना दोन्ही मुलांच्या निरागसतेचं वेड लागलंय.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. व्हिडीओ पाहिल्यानंतर, एका युजरने लिहिले की खरोखर बालपण ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने सांगितले की, दोन्ही मुलांनी त्यांच्या स्टाईलने लोकांची मने जिंकली. याशिवाय अनेक लोकांनी व्हिडीओवर अनेक प्रेमळ कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शन वाचून लोकांना हा व्हिडीओ किती आवडला आहे, याचा अंदाज येतोय.
आणखी वाचा : VIRAL : गर्लफ्रेंडला किस करण्याच्या नादात पोलिसाने गमावली नोकरी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
आणखी वाचा : आकाशातून पडला चक्क भलामोठा साप…; आरडा ओरड करत सैरावैरा पळू लागले लोक, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ २८ ऑक्टोबर रोजी kiansh_ayansh नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, जो आता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ जबरदस्त शेअर केला आहे.