आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. काही जण कुत्र्यांना अगदी जीवाप्रमाणे जपतात, आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांना प्रेम देतात आणि सांभाळ करतात. तर, काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही कुत्र्यांना त्रास देतात. प्राण्यांवर प्रेम करणारे फक्त आपल्या पाळीव कुत्र्यांचीच काळजी करतात, असं नाही. तर, इतर कुत्र्यांबद्दलही त्यांना तितकंच प्रेम असतं. कुठे जात असताना जर, एखादा कुत्रा अडचणीत दिसला तर असे लोक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अशाच एका व्यक्तीने इमारतीच्या आगीत अडकलेल्या तब्बल २५ कुत्र्यांना वाचवलं आहे.

रोज आपण सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो. काही मजेशीर असतात, काही विनोदी असतात, काही गंभीर असतात, तर काही एखाद्या प्राण्याला अडचणीत वाचवल्याचे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका इमारतीला आग लागली आहे, दरम्यान या आगीत जवळजवळ २५ कुत्रे अडकले आहेत. यावेळी एक व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालून इमारतीवर चढून कुत्र्यांचा जीव वाचवताना दिसत आहे. या व्यक्तीने सर्व २५ कुत्र्यांचा जीव वाचवला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा का विचारतात? कैदी फाशीच नको म्हणाला तर? जाणून घ्या

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्यक्तीने दाखवलेल्या माणूसकीचे कौतुक केलं आहे. एका कुत्र्याला वाचवण्यासाठी एक माणूस कसा जीव धोक्यात घालतो, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Story img Loader