आपल्याला खूप भूक लागलेली असताना जर समोर चविष्ट खाद्यपदार्थांनी भरलेल ताट आलं तर ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याची नव्याने जाणीव होते. अशावेळी आपल्याला पोटभर अन्न खायला मिळाले याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. पण सगळ्यांनाच रोज पोटभर जेवण मिळतेच असे नाही. आपल्या आजुबाजुला असंख्य निराधार व्यक्ती दिसतात, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. भूक म्हणजे काय हे अशा व्यक्तींनी खूप जवळून अनुभवले असेल, त्यामुळेच आपल्यासारख्या इतर निराधार जीवासाठी त्यांना काहीतरी करावेसे वाटते. याचा प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधून येत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक गरीब, निराधार व्यक्ती रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला दूध देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याजवळ ते दूध देण्यासाठी भांडी नसल्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीवरच ते कुत्र्याला पिण्यासाठी दूध ओतताना दिसत आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : नारळातून खोबरं काढण्याची भन्नाट कल्पना; IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

स्वतःजवळ काहीही नसताना आपल्यासारख्या निराधार असणाऱ्या जीवाला केलेली ही मदत पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्याकडे जितके आहे त्यातून गरजूंना मदत करण्याची ही भावना प्रेरणादायी आहे.

Story img Loader