पैसा हा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पण प्रामणिकपणा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही . कारण पैशांशिवाय आपल्या अन्न, वस्त्र, निवारा मुलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. कुटुंबाला सांभाळताना त्यांच्या गरजा भागवताना कितीही पैसे कामावले तरीही कमी पडतात, अनेकदा घरात अचानक आलेले आजारपण, संकटामुळे जवळ असलेले पैसा संपवून जातो. अनेकदा लोक पैसा कमावण्यासाठी आपला प्रामाणिकपणा सोडून वाईट मार्ग स्वीकारतात. पैसा जसा येतो तसा निघूनही जातो. त्यामुळे प्रामाणिकपणा सोडून मिळवलेले पैसा कायम टिकत नाही. गैरमार्गाने कमावलेला पैसा कधीही मनाला शांती मिळू देत नाही. देशात भ्रष्टाचार खूप वाढला आहे, फसवणूक खूप वाढले आहे, प्रामाणिकपणे जगणार्यांचा हा काळ राहिला नाही असे म्हणतात. पण जगात अजूनही चांगली आणि प्रमाणिक लोक आहेत म्हणून अजूनही या जगात माणुसकी टिकून आहे. प्रामाणिकपणा जपणारे फार कमी लोक असतात जे कितीही संकट आलं प्रामाणिकपणा कधीही सोडत नाही. काहीही परिस्थिती समोर आली तरी हार मानत नाही, कष्ट करतात, त्रास सहन करतात पण खोटं कधीही वागत नाही. सध्या अशा काही प्रमाणिक व्यक्तींची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा