सोशल मीडियावर बरेच जण व्हायरल होण्यासाठी विचित्र व्हिडीओ बनवून ते पोस्ट करतात. काही जण जीवावर बेतणारे स्टंट करताना दिसतात; तर काही जण अनेकांना चकित करून सोडताना दिसतात. तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीस पाहायला मिळालं आहे. मधमाश्या किती भयानक असतात हे अनेकांनी पाहिलं किंवा ऐकलं असेलच. एक जरी मधमाशी तुम्हाला दिसली तरी तुम्ही घाबरून तिच्यापासून पळ काढता किंवा कानावर हात ठेवता. पण, इकडे तर चक्क एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर दाढीपासून ते पोटापर्यंत हजारोच्या संख्येनं मधमाश्या पाहायला मिळाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीच्या शरीरावर मधमाश्यांच्या समूहानं चेहऱ्यावरील दाढीपासून ते पोटापर्यंत जणू आपलं पोळं तयार केल्यासारखं वाटत आहे. मधमाश्यांच्या पोळ्यातून मध काढतानाही विशिष्ट प्रकारची खबरदारी घेतली जाते. पण, या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांचा वापर न करता, स्वत:च्या शरीरावर मधमाश्यांचं थारोळं करून घेतलं आहे, असं म्हणायला हरकत नाही आहे. व्हिडीओत पुढे बघाल, तर ही व्यक्ती व्हिडीओ शूट करीत बिनधास्तपणे न घाबरता प्रेक्षकांशी संवाद साधतानाही दिसत आहे. एखाद्या व्यक्तीला एक मधमाशी जरी चावली तरी त्याच्या शरीराला सूज येते. मग या व्यक्तीचं पुढे काय झालं असेल याचा विचारसुद्धा करू शकणार नाही. हा व्हिडीओ खोटा असेल, असं तुम्हाला वाटू शकतं. पण, तुम्ही बघू शकता की,काही मधमाश्या या त्या व्यक्तीच्या डोक्यावरही फिरताना दिसत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तरी तुम्ही म्हणाल की, एका व्यक्तीच्या शरीरावर चक्क इतक्या मधमाश्या आल्याच कशा? तेव्हा एकदा बघाच हा थरारक व्हिडीओ.

हेही वाचा :- निष्काळजीपणाचा कळस! उंच इमारतींवर मुलांचा सुरु होता जीवघेणा खेळ: तरीही पालकांचे दुर्लक्ष, Video पाहून बसेल धक्का

नक्की बघा व्हिडिओ :-

हा व्हिडीओ सोशल मीडिआ ॲप इन्स्टाग्रामवरून (Extreme Official) एक्स्ट्रीम ऑफिशियल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक जण विविध प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. मधमाश्यांनी माणसांवर हल्ला केल्याचे व्हिडीओ याआधीही तुम्ही बरेच पाहिले असतील; पण हा व्हिडीओ अगदी सगळ्यांनाच चकित करणारा आणि अंगावर काटा आणणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey bee on man face video viral on social media asp