Viral Video: भारत देशाची परंपरा, संस्कृती, खाद्यपदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक परदेशातील लोकसुद्धा भारतातील लोकांचे राहणीमान, संस्कृती, कला, प्रसिद्ध पदार्थसुद्धा शिकण्याची किंवा विविध धार्मिक स्थळांना भेट द्यायला खूप आवडते. तसेच भारतातील अनेक जण परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करतात आणि भारतातील खाद्यपदार्थ, वस्तू तिथे विकताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीतरी पाहायला मिळालं आहे. एक ब्लॉगर, इन्फ्लुएन्सर अलीकडेच त्याच्या हाँगकाँगच्या सहलीदरम्यान ‘मिनी इंडिया’ इमारतीबद्दल सांगताना दिसला आहे .

व्हायरल व्हिडीओ हाँगकाँगचा आहे. ट्रॅव्हलर आणि इन्स्टाग्राम ब्लॉगर, इन्फ्लुएन्सर आकाश चतुर्वेदीने अलीकडेच हाँगकाँगमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो हाँगकाँगमधील ‘मिनी इंडिया’ या इमारतीबद्दल बोलत आहे. हाँगकाँगमधील या अनोख्या ठिकाणाला भेट देताना इन्फ्लुएन्सर दावा करतो आहे की, या मिनी इंडिया या इमारतीत प्रवेश केल्यानंतर भारतीय आपण हाँगकाँगमध्ये आहोत हे विसरून जातील. कारण येथे भारताशी संबंधित सर्व गोष्टी, खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. नक्की काय आहे या ठिकाणात खास व्हायरल व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…तिकीट नसलेल्या प्रवाशांना ‘त्याने’ शिकवला धडा; असा शोधला मार्ग की… नेटकरी म्हणू लागले त्याला ‘हीरो’

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:

https://www.instagram.com/reel/C8WpBrctYbA/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगर हाँगकाँगच्या मिनी इंडिया या इमारती प्रवेश करतो. दुकानदार दुकानातील भाज्या दाखवतो, ज्यामध्ये पालक पनीर, भेंडी आदींचा समावेश असतो. तेथे खायचे पानही मिळते हे पाहून ब्लॉगरला आश्चर्य वाटते. तसेच या इमारतीत शेर-ए-पंजाब हे प्रसिद्ध रेस्टॉरंटही तर एक शुद्ध शाकाहारी हॉटेलही सुद्धा उपलब्ध आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ब्लॉगरच्या @kaash_chaudhary या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “हाँगकाँगमध्ये मिनी इंडिया” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या मार्केटच्या ठिकाणाची चौकशी केली. व्हिडीओला १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांसह कमेंट विभागात गर्दी केली. एका युजरने कमेंट केली की, ‘ खूप महाग आहे’. दुसऱ्याने कमेंट केली आहे की, ‘येथे व्हेज पदार्थही मिळतात ही अनोखी गोष्ट आहे’. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.