करोनाचं संकट कमी होतंय असं वाटत असताा हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. करोनामुळे जवळपास ३०० लोकांनी एका आठवड्यात जीव गमावला आहे. गेल्या २४ तासात ८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयाअभावी काही जणांचा घरीच मृत्यू होत असल्याने त्याची कुठेही नोंद नाही. रुग्णालयं आणि शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाचं नवं संकट उभं राहतंय का असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावं लागेल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
हाँगकाँग पब्लिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिंग म्हणाले की, डझनभर मृतदेह शहरातील रुग्णालयांमध्ये शवगृहात नेण्याची वाट पाहत आहेत. रुग्णालयातील अनेक मृतदेह लॉबीमध्ये पडलेले आहेत तर शवागारे पूर्णपणे भरलेली आहेत. रूग्णालयात कर्मचार्यांचा तुटवडा जाणवत आहे. मृतदेह नेण्यासाठी अधिक वेळ लागेल असं दिसतंय. सरकारसुद्धा हतबल असल्याचं दिसत आहे.
Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?
हाँगकाँगमध्ये मोठ्या संख्येने वृद्ध लोक आहेत. या वृद्धांचं अद्यापही लसीकरण केले गेले नाही. अनेकांनी दुष्परिणामांमुळे लस घेतली नाही. तर व्हायरस नियंत्रणात आल्याने २०२१ मध्ये अनेकांनी लसीकरण केले नाही. हाँगकाँगची लोकसंख्या सुमारे ७४ लाख आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मृत्यूचा हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत एकूण मृतांची संख्या ३,२०६ वर पोहोचेल.